SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीईच्या २९ विद्यार्थींनींची कॅपजेमिनी या नामांकीत कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवरती निवडजिल्हाधिकारी कार्यालय येथे 27 वा कारगिल विजय दिवस साजराडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवडजलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार : जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील​"मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही"महसूल सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरकारगिल विजय दिवस: भारतीय शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचा सुवर्णदिनआषाढी एकादशीनिमित्त ‘गोकुळ’च्या दुधाची उच्चांकी विक्रीबालकांचे शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरलाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात कोल्हापुरात काँग्रेसचा कॅन्डल मार्च

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

schedule26 Jul 26 person by visibility 194 categoryशैक्षणिक

🟣 प्लेसमेंटचा नवा विक्रम -६.३ लाख रुपये सरासरी पॅकेज

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ६३८  विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयाकडून  गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, सर्वांगीण विकासावर दिलेला भर  आणि सक्षम प्लेसमेंट व्यवस्था यामुळे यावर्षीही विक्रमी संख्येने विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देता आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांनी सांगितले. 

यावर्षी एच.पी., मोव्हेट,  टीई कनेक्टिव्हिटी, टीसीएस, जॉन्सन कंट्रोल्स, डिलॉईट, ब्रिटिश पेट्रोलियम, हेक्सावेअर, अमेझॉन, टेक महिंद्रा, इन्फोसिस, फोर्स मोटर्स, भारत फोर्ज, शेफलर इंडिया, लुकास टीव्हीएस, सोलर ग्रुप, सागर डिफेन्स, टेक्निमाँट, हार्मनी ऑर्गॅनिक्स, प्लेटेक्स इंडिया, गोदरेज प्रॉपर्टीज, बेलराईज इंडस्ट्रीज यांसह विविध कंपन्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड केली. 

निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील,  कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राचार्य उपस्थित होते.


 यावर्षीच्या प्लेसमेंट मध्ये  सरासरी ६.३ लाख रुपये  पॅकेज मिळाले असून, २०० हून अधिक विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक पगाराच्या ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. मोव्हेटमध्ये ९ लाख रुपये, एचपी ८.५ लाख रुपये, टीई कनेक्टिव्हिटीमध्ये ८ लाख रुपये, टीसीएसमध्ये ७ लाख रुपये, जॉन्सन कंट्रोल्समध्ये ५.६ लाख रुपये, सोलर ग्रुप व पेगाससमध्ये ५.५ लाख रुपये, जीएचके हॉस्पिटॅलिटी अँड इन्फ्रा लिमिटेडमध्ये ५.२५ लाख रुपये तसेच डिलॉईट आणि ब्रिटिश पेट्रोलियममध्ये ४.५ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

विश्वस्त ऋतुराज पाटील म्हणाले, नुकतेच महाविद्यालयाला वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार एनबीए मानांकन प्राप्त झाले असून, शिवाजी विद्यापीठाकडून अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही प्राप्त झाला आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली असून  भविष्यात अधिक जास्त संख्येने मोठ्या पॅकेजच्या संधी निश्चितच मिळतील.

विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले, प्लेसमेंटमधील हे यश विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या सक्षम शैक्षणिक व्यवस्थेचे प्रतीक आहे. आगामी काळातही रोजगारक्षम शिक्षणाला  प्राधान्य दिले जाईल.

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, कोडिंग प्रॅक्टिस, करिअर काउन्सेलिंग, इंटर्नशिप तसेच प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योग–महाविद्यालय सहकार्य, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक प्रयोगशाळा, इनोव्हेशन आणि संशोधनाला दिले जाणारे प्रोत्साहन यामुळे विद्यार्थ्यांना देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये करिअरच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध झाल्या. 

 अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, सर्व विभागप्रमुख, प्लेसमेंट समन्वयक तसेच प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व योगदान लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes