गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठी कारवाई; हद्दपार केलेले ९ सराईत गुन्हेगार जेरबंद
schedule19 Sep 26 person by visibility 61 categoryगुन्हे
कोल्हापूर : गणेशोत्सव काळात जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या मुदतीत कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात बेकायदेशीरपणे वावरत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राजारामपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्दीतून नियम मोडून विनापरवाना फिरणाऱ्या एकूण ९ सराईत आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
कारवाई करण्यात आलेले हद्दपार आरोपी:
* राजारामपुरी पोलीस ठाणे हद्द:
१. अजय अनिल पाथरवट (वय २६, रा. सायबर चौक, कोल्हापूर)
२. अल्ताफ अकबर देवडी (वय २६, रा. यादवनगर, कोल्हापूर)
३. करण उदय सावंत (वय २५, रा. राजारामपुरी, कोल्हापूर)
४. मंदार मधुकर दिडे (वय २५, रा. यादवनगर, कोल्हापूर)
५. अविनाश शांताराम कोकाटे (वय २७, रा. मोतीनगर, कोल्हापूर)
६. अमोल नंदू हळदीकर (वय ३९, रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर)
* जुना राजवाडा पोलीस ठाणे हद्द:
१. विशाल बबन जाधव (वय ३२, रा. सुभाषनगर चौक, कोल्हापूर)
२. सौरभ दीपक कांबळे (वय २७, रा. गंजीमाळ, कोल्हापूर)
३. सिद्धेश विनायक कांबळे (वय २३, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर)
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी ही धडक कारवाई पार पाडली आहे.