कोल्हापुरातअट्टल मोटर सायकल चोरट्यास अटक; ७ मोटर सायकली जप्त
schedule15 May 25 person by visibility 321 categoryगुन्हे

कोल्हापूर : अट्टल मोटर सायकल चोरट्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४ लाख रूपये किंमतीच्या एकूण ७ मोटर सायकली जप्त करण्यात आल्या याबाबत ६ गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार वैभव पाटील व गजानन गुरख यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, मोटर सायकल चोरी करणारे कॉर्डवरील आरोपी अमित चंद्रकांत हत्तीकोटे, रा. सानेगुरूजी वसाहत, कोल्हापूर याने मोटर सायकली चोरलेल्या असून तो चोरीची मोटर सायकल घेवून फिरत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळालेने दि. १४/०५/२०२५ रोजी मैल खड्डा, निर्माण गौक येथे सापळा लावून ज्यूपीटर मोटर सायकलसह त्यास ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातील ज्युपीटर मोटर सायकलचे चेसिस नंबर व इंजिन नंबर वरून अभिलेखाची पाहणी केली असता सदरची मोटर सायकल जुनाराजवाडा पोलीस ठाणे येथून चोरीस गेली असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने आणखीन ०५ मोटर सायकली चोरी केल्याची कबुली देवून चोरलेल्या मोटर सायकली जुने एनसीसी मैदान येथुन ताब्यात घेतल्या,
वरील प्रमाणे एकूण ७ मोटर सायकली कायदेशिर प्रक्रीया करून जप्त केल्या असून एकूण ०६ मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत, आरोपी अमित हत्तीकोटे याचेवर एकूण मोटर सायकल चोरीचे ०८ गुन्हे दाखल असून त्यास पुढील तपासकामी जुना राजवाडा पोलीस ठाणेच्या ताब्यात देणेत आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. वी, धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक, संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदिप पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, संतोष बरगे, परशुराम गुजरे, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, सुहास कांबळे यांनी केली आहे.
