SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुस्लिम बांधवांची ईदुल-अजहा (बकर ईद) शनिवारी, नमाज वेळापत्रकसस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शितकोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणी पुरवठा बंद; काळम्मावाडी पंपिंग स्टेशनची होणार दुरुस्तीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर सोमवारी जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहनशिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी केले रक्तदानशिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजराशिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनविकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली

जाहिरात

 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन

schedule05 Jun 25 person by visibility 172 categoryसामाजिक

कोल्हापूर  :  आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351व्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्याचे तोरण ज्यादिवशी खऱ्या अर्थाने लावले गेले तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. 

ज्या प्रेरणेने मावळ्यांनी आपले रक्त सांडून स्वराज्य निर्माण केले, त्याच उमेदीने रक्तदान करून सर्वसामान्य रुग्णांच्या मदतीला जाता यावे हा हेतू ठेऊन दरवर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी शिबिराचे पाचवे वर्ष असून छत्रपती शिवाजी चौक येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबीर संपन्न होणार आहे. तरी इच्छुकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीने पत्रकाद्वारे केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes