SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुस्लिम बांधवांची ईदुल-अजहा (बकर ईद) शनिवारी, नमाज वेळापत्रकसस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शितकोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणी पुरवठा बंद; काळम्मावाडी पंपिंग स्टेशनची होणार दुरुस्तीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर सोमवारी जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहनशिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी केले रक्तदानशिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजराशिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनविकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली

schedule05 Jun 25 person by visibility 165 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळ यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील प्रमुख पाच रस्त्यावर पर्यावरण जनजागसृती  रॅली काढण्यात आली.


 ही रॅली संभाजी नगर ते दसरा चौक, फुलेवाडी , रंकाळा, गंगावेश, भगवा चौक बावडा ते रंमनमळा कलेक्टर ऑफिस, हॉकी स्टेडीयम, गोखले कॉलेज, उमा टॉकीज, लक्ष्मीपूरी, राजारापूरी, बागल चौक ते व्हिनस कॉर्नर, न्यु महाद्वारोड, सीपीआर चौक, कावळानाका ते दसरा चौक, छ.शिवाजी विद्यापीठ पासून दसरा चौक या प्रमुख मार्गानी काढण्यात आली. यामध्ये आटो टिप्पर वाहनावर स्वच्छ भारत अभियांन व प्लास्टिक बंदीचे फलक लावून जनजागृती करण्यात आली.  

तसेच शहरामध्ये ॲटो टिप्परच्या माध्यमातून प्लास्टिक बंदीबाबत स्पीकरवरुन जनजागृती करण्यात आली.  संदेश प्रसारीत करण्यात आला. सर्व वाहणावर  प्रदुषण मुक्त वातावरणचे फलक लावण्यात आले.  या रॅली मध्ये ॲटो टिप्पर, पीयुसी कार, ई बस, सीएनजी कार, ॲटो सीनजी, मोबाईल व्हॅन आदी वाहनांचा समावेश होता.  शेवटी दसरा चौक येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने शपथ घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त कृष्णा पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, शहर समन्वयक   आरोग्य निरिक्षक, मुकादम, टिपरचालक आदी उपस्थिती होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes