SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई'गोकुळ'वर सतेज पर्व! ...आपलं गोकुळ टिकणार!पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी कामगारांना २ ते ४ तासांची विशेष सवलतशुक्रवारी २३ ऑक्टोबरला मतदान ! विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत असे करा मतदान...गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न पैशाअभावी थांबू देणार नाही; व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडेकोल्हापुरात खळबळ! जयसिंगपूरजवळ दिवसाढवळ्या सराईत गुन्हेगार महेश दळवी यांची गोळी झाडून निर्घृण हत्याआयुष्याचे खरे मूल्यमापन: 'इव्हॅल्युएट युअर लाईफ डे'अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार; चालकसह दोघेजण जखमीगोकुळ दूध संघ निवडणूक: जिल्ह्यात ९९.९६% विक्रमी मतदान; १० तालुक्यांत १००% कौल!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर ; महायुतीच्या प्रचाराला मिळणार बळ

जाहिरात

 

तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

schedule19 Oct 26 person by visibility 113 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : छ.ताराराणी चौक ते तावडे हॉटेल या परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन, विभागीय कार्यालय क्रं.4 छ.ताराराणी मार्केट व उपद्रव शोध पथकाने अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली. 


छ.ताराराणी चौक ते तावडे हॉटेल या परिसरात कारवाईवेळी 21 डिजीटल बोर्ड, 25 झेंडे, 2 कॅरेट, 2 काटे तसेच तावडे हॉटेल ते गांधीनगर या परिसरात कारवाई करुन 27 लोखंडी पाईप, 2 लोखंडी स्टॅण्ड, 4 कमान बोर्ड, 2 जाळी स्टॅण्ड, 3 बोर्ड, 10 फायबर खुर्च्या, 1 जाहिरात बोर्ड व 1 मोठी छत्री जप्त करण्यात आल्या. 


शहरातील अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधित व्यावसायिकांना परत दिले जाणार नसून, ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम प्रदीप तवंदकर व प्रशांत आकुर्डेकर यांच्यासह अतिक्रमण, विभागीय कार्यालय क्रं.4 कडील कर्मचारी आणि उपद्रव शोध पथकातील जवान या मोहिमेत सहभागी झाले होते.

◼️अतिक्रमणधारकांना महापालिकेचा इशारा
शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिक, रस्त्यांवर उभारलेले अनधिकृत शेड्स आणि इतर अतिक्रमणांविरोधातील कारवाई आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येणार आहे. संबंधितांनी आपापली अतिक्रमणे तातडीने स्वतःहून हटवावीत. अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेने दिला आहे. तसेच अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes