SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधाचा निषेध; मुंबईत भाजपचा विराट जन आक्रोश मोर्चानिवडणूक रणधुमाळी: पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगताबारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता; महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला 'इंडिया स्किल्स ' स्पर्धेमध्ये रौप्यपदकवारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरुई येथे पंचगंगा नदीत बुडालेला यड्रावचा तरुण मृतावस्थेत आढळला‘डीकेटीईच्या मेकॅनिकलमधील विद्यार्थ्यांची टेस्ला या जगविख्यात कंपनीमध्ये भक्कम कामगिरी’कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कारदिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन नरके यांचे मार्गदर्शन

जाहिरात

 

शासकीय वसतिगृह व स्वयंम योजनांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

schedule04 Mar 26 person by visibility 232 categoryआरोग्य

कोल्हापूर : राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी https://hmas.mahait.org या शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर प्रवेश अर्ज मागविण्याबाबत वेळापत्रक देण्यात आले आहे.

शासकीय वसतीगृह पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2025-26 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
 बी.ए./बीकॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी - 25 फेब्रुवारी ते 10 मार्च,  पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिध्द करणे- 11 मार्च व निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत 12 ते 20 मार्च असणार आहे.

योजनेसाठी पात्र असणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वरील नमूद कालावधीत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरावेत.अधिक माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण (तिसरा मजला), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विचारे माळ, बाबर हॉस्पीटल जवळ, कोल्हापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात आले .

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes