आधार संस्थेतर्फे पुरस्कारांची घोषणा; शनिवारी वितरण
schedule28 Apr 22 person by visibility 1400 categoryसामाजिक

इचलकरंजी : सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्रा आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना आधार भूषण, आधार गौरव व आधार विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाच्या गौरव व विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून शनिवार 30 एप्रिल रोजी दुपारी 5 वाजता पुरस्कार वितरण सोहळा कृष्णानगर येथील आधार लायब्ररीत संपन्न होत आहे, अशी माहिती आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर, बैतुलमाल कमिटी अध्रक्ष लतिफ गैबान, आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबूब मुजावर, ईद फेस्टिवलचे उपाध्रक्ष नुरमहंमद बागवान, संस्था उपाध्रक्ष हारुण पानारी यांनी दिली.
दरम्यान, रमजान ईद निमित्त आधार बैतुलमाल कमिटीच्यावतीने शनिवारी (30 एप्रिल) रोजी सकाळी 10 वाजता गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी संस्थेच्यावतीने हाजी सलीम बागवान रांना ‘आधार भूषण’ पुरस्कार देण्रात रेणार आहे. तर अहमद मुजावर (सामाजिक), बापूसाहेब चौधरी (अभिरंता), डॉ. आरुब विजापूरे (वैद्यकिय), डॉ. असिफ सौदागर (वैद्यकिय) व अॅड. रिराज बाणदार यांची ‘आधार गौरव’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर गौसुलआजम पटेल, निलोफर तांबोळी, डॉ. आसिरा फकिर व मोहसीन मुल्ला रांना ‘आधार विशेष’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवार सलीम म्हालदर रांना ‘उत्कृष्ठ संचालक’ पुरस्कार देण्रात रेणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ अप्पर पोलिस अधिक्षक जरश्री गारकवाड यांचे हस्ते आणि राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्र मदन कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक नितीन जांभळे, शशांक बावचकर, माजी उपनगराध्रक्ष तानाजी पोवार, सुनिल महाजन, उद्योजक अस्लम सय्रद, अजीजशेठ खान, जहाँगिर पटेकरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
याचदिवशी सकाळी 10 वाजता समाजातील गरजू लोकांना खीर साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर व आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते व सराजी चव्हाण, प्रकाश दत्तवाडे, आदिल फरास, धोंडीलाल शिरगांवे, रणजित जाधव, कैश बागवान आदींची उपस्थिती असणार आहे.