भारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतक
schedule07 Feb 26 person by visibility 117 categoryक्रीडा
मुंबई : कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या आणि भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने २०२६ च्या टी२० विश्वचषकाच्या पहिल्या गट सामन्यात अमेरिकेचा २९ धावांनी पराभव केला आणि स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.
भारताने २०२६ च्या टी२० विश्वचषकात आपला पहिला गट सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध खेळला. अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ गडी गमावून १६१ धावा केल्या, तर अमेरिकेला २० षटकांत ८ गडी गमावून फक्त १३२ धावा करता आल्या.
या सामन्यात भारताची फलंदाजीची सुरुवात आव्हानात्मक वाटत होती, परंतु त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खेळीने भारताला अडचणीतून बाहेर काढले. भारताने १६१ धावा केल्या, जे विजयासाठी पुरेसे होते आणि यूएसए संघ हा स्कोअर गाठण्यात अपयशी ठरला. भारताने विजयासोबत दोन गुण मिळवले.