SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुणगौरव सोहळा उत्साहात महिन्यापूर्वी सुनावणी झालेल्या दूध संस्थांचे निकाल द्या; गडहिंग्लज तालुक्यातील संस्थांची मागणीसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा उत्साहात निरोप समारंभकल्पनेपासून कृतीपर्यंत : केआयटीमध्ये उद्योजकतेचा प्रेरणादायी जागरजागतिक थायरॉईड दिन: आरोग्य आणि जागरूकतेचा संदेशशिवाजी विद्यापीठात उद्यापासून जागतिक पर्यावरण अभियानराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदानउत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणे उपलब्ध; गरीब रुग्णांना मोठा दिलासा'स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधारवड'

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुणगौरव सोहळा उत्साहात

schedule25 May 26 person by visibility 83 categoryशैक्षणिक

◼️मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाची सलोनी पाटील यावर्षीची ‘बेस्ट आउटगोइंग स्टुडंट’

वारणानगर  : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सन २०२५-२६ चा वार्षिक गुणगौरव समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात गतवर्षी शैक्षणिक क्षेत्रात विद्यापीठ, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय व उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

गुणगौरव समारंभामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षात *विशेष गुणवत्ता* प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. याशिवाय देशपातळीवरील ‘गेट’सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे व कुलाधिकारी एन. एच. पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऋषी इंडिया इन्फ्रा इंजिनिअरिंग, भोपाळचे संचालक रोहन मणियार व पूनम मणियार उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी यशस्वी उद्योजक होण्याचा प्रेरणादायी व संस्मरणीय प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. विद्यार्थ्यांनी आपला बायोडेटा अधिक प्रभावी बनवावा तसेच व्यावसायिक नेटवर्क वाढवण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. जपानी ‘इकिगाई’ संकल्पनेचा संदर्भ देत, “तुम्हाला जे आवडते आणि जे तुम्ही उत्तम प्रकारे करू शकता, त्याच क्षेत्रात करिअर घडवण्याचा प्रयत्न करा,” असा मोलाचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सांगितले की, महाविद्यालयाला माजी विद्यार्थ्यांचा समृद्ध वारसा लाभलेला असून, आपण ज्या संस्थेत शिक्षण घेतले त्या संस्थेला काहीतरी परत देण्याची तळमळ त्यांच्यामध्ये दिसून येते. अपयश हे माणसाला अनेक गोष्टी शिकवून जाते, त्यामुळे नैतिकता आणि मूल्ये आयुष्यभर जपली पाहिजेत, असा कानमंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी सर्व विजेते व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या ‘सायबर सिक्युरिटी’ आणि ‘कंप्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टिम’ या नव्या अभ्यासक्रमांची माहिती दिली. याचबरोबर शिक्षण मंडळांतर्गत पुणे विभागामधील पहिले खासगी ‘तात्यासाहेब कोरे व्हेटर्नरी अँड ॲनिमल सायन्स’ महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एन. माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांनी कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीविषयी माहिती दिली.
 
कार्यक्रमाचे आभार समन्वयक डॉ. एन. एस. धाराशिवकर यांनी मानले.
यावेळी डॉ. के. आय. पाटील, समन्वयक प्रा. ए. जी. पाटील, प्रा. बी. आर. बागणे व टीम, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारीवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. गणेश कांबळे, डॉ. समाधान जाधव, प्रा. मिलिंद कामत आणि प्रा. अस्मिता माने यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धी पाटील, रितू घोडके आणि स्वानंदी कुलकर्णी यांनी केले.

या वर्षीचा ‘बेस्ट आउटगोइंग स्टुडंट’ होण्याचा मान मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या सलोनी पाटील हिने पटकावला. विविध निकष, चाचण्या तसेच एक्स्टर्नल एक्स्पर्ट यांच्या मूल्यमापनाद्वारे या पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गेली ३४ वर्षे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जात असून, हा पुरस्कार प्राप्त केलेले अनेक विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes