SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हरोली येथील आरोग्य शिबिरात ४९० नागरिकांची तपासणी'विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासावी' : निवृत्त मेजर रत्नाकर तिराळे यांचे आवाहनशक्तीपीठ महामार्गाविरोधात १३ जिल्ह्यांचा एल्गार; लातूर, हिंगोलीतून ठिणगी पडणार. शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाहीविरोधकांना आताच ‘पी. एन.’ गटाचा पुळका का आला?गोकुळ संपवणे हाच महायुतीचा अजेंडा : आमदार सतेज पाटील; चुये येथे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत संवाद कौशल्ये विकसित करावीत : अकिब शेखआंतरराष्ट्रीय बालिका दिन: मुलींच्या सबलीकरणाचा संकल्प मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म नियोजन व जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा : जिल्हाध्यक्ष विजय जाधवपुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता देवी जाधव आणि शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार : भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

जाहिरात

 

'विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासावी' : निवृत्त मेजर रत्नाकर तिराळे यांचे आवाहन

schedule11 Oct 26 person by visibility 121 categoryशैक्षणिक

मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिरात 'सैनिक आपल्या भेटीला' उपक्रम उत्साहात संपन्न
कसबा बावडा  : मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर, शाळा क्र. ११, कसबा बावडा येथे शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाचे औचित्य साधून 'सैनिक आपल्या भेटीला' या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्य दलातील निवृत्त मेजर  रत्नाकर तिराळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना, "मनात देशासाठी भरीव योगदान देण्याचा दृढ निश्चय बाळगा, संकटांना न घाबरता सामोरे जा आणि जीवनात शिस्त अंगी बाणवून राष्ट्रीय एकात्मता जोपासा," असे स्फूर्तीदायी आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी पुस्तक भेट देऊन मेजर तिराळे यांचा सत्कार केला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक  आर. जी. किर्तीकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आपल्या भाषणाची सुरुवात करत मेजर तिराळे यांनी शिस्त, पुस्तकांचे महत्त्व आणि सैनिकी जीवनातील विविध पैलू यांवर प्रकाश टाकला. परीक्षा आणि ताण-तणावापासून दूर राहून विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कला-कौशल्ये ओळखावीत आणि देशसेवेचा संकल्प करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. भाषणाची सांगता त्यांनी 'हर हर महादेव'च्या घोषणेने केली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अजितकुमार पाटील म्हणाले की, २१ व्या शतकातील आव्हानांचा विचार करता मुलांमध्ये विशिष्ट जीवनमूल्यांचे सिंचन करणे गरजेचे आहे. स्काऊट-गाईड आणि एनसीसी यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजते. "दररोज वाचन, नियमित व्यायाम, स्वयंशिस्त आणि उच्च विचारसरणी जोपासणे आवश्यक असून मन, मेंदू व मनगट यांचा समन्वय म्हणजेच खरे शिक्षण," असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात आराध्या काळे, स्वरा देवकुळे, चरण धुरी, साबिया, आदित्य कांबळे व विराज दाभाडे या विद्यार्थ्यांनी मेजर साहेबांना कुतूहलाने प्रश्न विचारून सैनिकांच्या थरारक अनुभवांबद्दल माहिती जाणून घेतली.

या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभुदास दाभाडे, भारतवीर मित्र मंडळाचे पदाधिकारी, पूनम कुंभार, दिलदार रसाळ, विद्या पाटील, अमित पोटकुले, उत्तम पाटील, दिपाली यादव, बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सावित्री काळे, नीलम पाटोळे यांच्यासह माता-पालक संघ, इको क्लबचे सदस्य व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्ती आणि प्रेरणेचा संगम ठरलेल्या या कार्यक्रमाचे आभार  उत्तम कुंभार यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes