SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करण्यास मान्यताशिवाजी विद्यापीठाचा इन्फ्राप्लान समुहासमवेत सामंजस्य करार; जलविद्याविषयक संशोधनाला गती मिळणारराष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएच.डी.अंबाबाई मंदिराचे जतन-संवर्धन योग्य मार्गावर: पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले पाणीगळतीचे कारण!ऑनलाईन सेवांचा विस्तार करा; नागरिकांना घरी बसूनच सेवा मिळाल्या पाहिजेत : राज्य आयुक्त सुधाकर तेलंगपंजाबमध्ये भाजपची घोडदौड: जनसंपर्क मोहिमेद्वारे पक्ष बळकटीकरणावर भर!फिफा वर्ल्ड कप २०२६: फ्रान्स विरुद्ध स्पेन - महासंग्रामाची रंगत!विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अभाविप आक्रमक; विविध मंत्र्यांची भेट घेऊन केली मागण्यांची जोरदार मांडणीशार्क अवेअरनेस डे: महासागराच्या ‘रक्षक’ शिकारीबद्दल घ्या जाणून!

जाहिरात

 

गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करण्यास मान्यता

schedule14 Jul 26 person by visibility 128 categoryराज्य

मुंबई  : इतर राज्यातून येणाऱ्या गौण खनिजावर देखरेख शुल्क आकारता यावे यासाठी महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन ( विकास व विनियमन) नियम, २०१३ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यात अनेक ठिकाणी इतर राज्यातून गौण खनिज आणले जाते. अशा प्रकारच्या गौण खनिजामुळे स्थानिक खाण चालकांचे हिताला बाधा पोहोचते त्याचबरोबर अवैध वाहतुकीचे प्रमाणही वाढते. राज्याला आपल्या हद्दीत येणाऱ्या खनिजांवर शुल्क लावण्याचे अधिकार आहेत.

त्यानुसार इतर राज्यातून येणाऱ्या खनिजांवर देखरेख शुल्क किंवा वाहतुक शुल्क लावु शकते. यानुसार तेलंगणाने इतर राज्यातून येणाऱ्या गौण खनिजावर २०० रुपये प्रति मेट्रिक टन नियमन शुल्क आकारले आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाने इतर राज्यातून येणाऱ्या गौण खनिजावर १०० रुपये प्रति मेट्रिक टन नियमन शुल्क आकारता येण्यासाठी नियमात सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes