चंद्रकांत दादा पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती बद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव
schedule15 Dec 24 person by visibility 195 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूरचे सुपुत्र नाम चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली या नियुक्ती बद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचा विजय असो, चंद्रकांत दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून हा आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, कोल्हापूरच्या सुपुत्राने सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट पदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी दोन वेळा मिळालेल्या खात्यांची जबाबदारी त्यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळले आहे आत्तासुद्धा त्यांच्या मंत्रीपदामुळे कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला तसेच दादा जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रदेश सचिव महेश जाधव यांनी चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन केले. चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्याच्या आधारे त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान असून यापूर्वी ज्या पद्धतीने मिळालेल्या खात्यांना न्याय दिला अशाच पद्धतीचे कार्य दादांच्या माध्यमातून होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीत देखील सर्वांनी एकदिलाने कार्य करून महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे सांगितले.
याप्रसंगी अशोक देसाई विराज चिखलीकर विशाल शिराळकर विजयसिंह खाडे पाटील अजित ठाणेकर अमर साठे माधुरी नकाते संतोष माळी विजय आगरवाल राजू मोरे सयाजी आळवेकर, सतीश आंबर्डेकर योगेश कांगटणी सचिन बिरांजे अजित सूर्यवंशी अनिल कोळेकर महेश यादव ओंकार खराडे प्रीतम यादव अरविंद वडगांवकर सुनील पाटील रोहित कारंडे विश्वास जाधव सचिन घाटगे विनय खोपडे बंडा गोसावी अनिल कामत विद्या बागडी प्रग्नेश हमलाई सुमित पारखे रवींद्र मुतगी संग्राम जरग दिलीप बोन्द्रे विद्या बनछोडे पारस पलीचा यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.