SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पालघर अपघात : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरिततात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्षमगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलजागतिक नाविक दिन: जागतिक अर्थव्यवस्थेचे अनमोल शिल्पकार​"कोल्हापूरच्या हद्दवाढीवर निर्णय घ्या, ...": आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात केली सरकारची कोंडी!राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे 26 जून रोजी उद्घाटनशिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायत इमारतींसाठी १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठपुरावा विद्यार्थीसंख्या वाढीसाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता आवश्यक : डॉ. विलास शिंदेकळंबा तलावातील गाळ उपशासाठी शेतकऱ्यांना महापालिकेचे आवाहनबोगस डॉक्टरांचे आता खैर नाही! 'नो युवर डॉक्टर' क्यूआर कोड स्कॅन करा आणि तपासा; हसन मुश्रीफ यांचा इशारा

जाहिरात

 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

schedule25 Jun 26 person by visibility 288 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार दिनांक 29 जून रोजी शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी दिली .

 गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष आपापल्या परीने ठराव दाखल करण्याच्या मोहिमेमध्ये आघाडी घेत आहेत . भारतीय जनता पक्षाने ठराव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नाम.चंद्रकांतदादा पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यालयात ठराव धारकांचा मेळावा घेऊन ताकतीने ठराव गोळा करण्याचे ठरविले होते.

त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या ठराव गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे.

 सोमवार दिनांक 29 जून रोजी सकाळी दहा वाजता धैर्यप्रसाद हॉल कोल्हापूर येथे एकत्र जमून, तेथून शक्ती प्रदर्शनाने सहाय्यक निबंधक (दुग्ध )कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी जाऊन ठराव दाखल करण्याची नियोजन केले आहे.

 महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील,खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडिक,आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री भरमू अण्णा पाटील माजी, आमदार सुरेशराव हाळवणकर, माजी आमदार संजय बाबा घाटगे, राजे समरजितसिंह घाटगे, गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक, प्रवीण सिंह पाटील (मुरगूडकर ) गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजीराव पाटील, स्वाती कोरी, अशोकराव चराटी, के एस चौगुले, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, हंबीरराव पाटील या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुर येथील धैर्यप्रसाद हॉल पासून सहाय्यक निबंधक कार्यालय दुग्ध कोल्हापूर इथ पर्यंत शक्ती प्रदर्शन करत सर्व ठराव धारक ठराव दाखल करण्यासाठी जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 तरी कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्ते आणि ठराव धारकांनी सोमवार दिनांक 29 जून रोजी सकाळी दहा वाजता धैर्यप्रसाद हॉल कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes