भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान, आमशी येथे कार्यकर्त्यांची बैठक
schedule14 Dec 24 person by visibility 170 categoryराजकीय
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यासाठी करवीर तालुक्यातील सांगरूळ जिल्हा परिषद मतदार संघातील बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्त्यांची बैठक आमशी तालुका करवीर येथे पार पडली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमशीच्या सरपंच आरती सरदार सावंत या होत्या .
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या संदर्भात यावेळी कोल्हापूर भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे, जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव, जिल्हा चिटणीस अनिल देसाई, दिलीप खाडे ,अजितसिंह चव्हाण ,युवा मोर्चाचे अध्यक्ष सरदार सावंत,जिल्हा सरचिटणीस सुशीला पाटील, सावेकर , तुकाराम चौगुले, विकास बाटे, तालुका सरचिटणीस प्रकाश पाटील, यांचे सह सांगरूळ जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक तालुका सरचिटणीस अमित कांबळे यांनी केले .