गारगोटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथविधी समारंभाचे प्रक्षेपण; कार्यकर्त्यांचा जल्लोष
schedule05 Dec 24 person by visibility 220 categoryराजकीय
गारगोटी : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांची नियुक्ती झाली .त्यांचा शपथविधी समारंभ आझाद मैदान मुंबई या ठिकाणी पार पडला. या शपथविधी समारंभाचे थेट प्रक्षेपण गारगोटी येथील क्रांतिसिंह नाना पाटील व्यासपीठावर मोठ्या उत्साहात करण्यात आले .
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी भुदरगड मधील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या शपथविधी कार्यक्रमानंतर गारगोटीतील हुतात्मा क्रांती ज्योतीस पुष्पहार अर्पण करून उपस्थित कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून मोठा जल्लोष साजरा केला .
यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर तालुकाध्यक्ष नामदेव चौगले,,प्रा.राजेंद्र ठाकूर,गारगोटी ग्रामपंचायत सदस्य राहुल चौगुले, नंदकुमार शिंदे , रविंद्र कामत, वसंतराव प्रभावळे, महिला आघाडी अध्यक्ष ऐश्वर्या पुजारी सरचिटणीस सुजाता थडके सुधाताई पाटील सौ अश्विनी चौगुले गणपतराव शेटके, पंडीत पाटील, विरकुमार पाटील ' विलासराव बेलेकर, करडवाडी विनोद कांबळे भिकाजी देसाई,पांडुरंग वायदंडे, शिवाजी पाटील, रामभाऊ पाटील,संतोष बरकाळे, संजय भोसले, जोतिराम शिंदे, संतोष पाटील, सचिन देसाई, रणजित आडके,सुनील तेली,विनोद जाधव , तुकाराम देसाई ,शशिकांत पाटील , अवधूत राणे,आनंदा रेडेकर,,सचिन हाळवणकर, विकास चांदेकर ,भगवान शिंदे,सुरेश सुतार,बाळासाहेब वैराट, विकास चांदेकर,सृजन निंबाळकर,सचिन घरपणकर, किरण गुरव, अवधूत सुतार , लखन लोहार ,संजय मिटके, मोहन सूर्यवंशी, अजित शिंदे विठ्ठल पाटील दत्ता कुपटे, शंकरराव जठार,मुस्तफा शेख,अविनाश कवडे, दयानंद कांबळे, रोहित देसाई, बाबुराव पिंगळे,रामचंद्र पाटील, जयसिंग पाटील, पी.बी.खुटाळे, शिवाजी पाटील, विनोद जाधव, प्रशांत पुजारी, तुकाराम देसाई,दिपक डोंगरे,रणधीर गुरव यांचे सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .