SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संयुक्त संगमनगर तारदाळ श्रीराम चौक येथे श्रीराम नवमी उत्सव उत्साहात महिला व बालकांच्या पोषणात लक्षणीय सुधारणेचे उदिष्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनआदर्श फौंडेशनचा पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात बुवाबाजीविरोधात अंनिसची निदर्शने; नाट्यप्रयोगांतून करणार जनजागृती, १२ एप्रिलला बुवाबाजी विरोधी सत्यशोधन परिषदआरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज : ब्रिगेडिअर डेचेन चोएडेनइनोव्हेटर्स विद्यार्थ्यांना स्टार्टअप्ससाठी सुवर्णसंधी केआयटी च्या सहकार्याने मिळणार २-१० लाखाची डीएसटी इग्निशन ग्रांट उपलब्धभगवान महावीर जयंती: अहिंसा आणि शांततेचा महामंत्रअवसायनातील दूध संस्थांच्या न्यायासाठी ‘गोकुळ’ची ठाम भूमिका : चेअरमन नविद मुश्रीफशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जाहिरात

 

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

schedule31 Mar 26 person by visibility 131 categoryराज्य

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार आज मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या सूचनांनुसार, विजेचा कडकडाट ऐकू आला की तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

 झाडाखाली, शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोनचा वापर करू नये. तसेच निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर न पडता पाय एकत्र करून बसून राहावे, असेही सांगण्यात आले आहे.

प्रशासनाने ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत तातडीने जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णवाहिका व अग्निशमन दल सतर्क ठेवण्यात यावेत, तसेच शाळा, सभागृहे व सार्वजनिक इमारती सुरक्षित आश्रयस्थळ म्हणून खुले ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान खात्याचे अद्ययावत संदेश गावपातळीपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकरी बांधवांनी विजेच्या इशाऱ्याच्या काळात शेतातील कामे टाळावीत, बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे, तसेच यात्रास्थळे व मोठ्या जमावाचे कार्यक्रम तातडीने स्थगित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वत्तीने कळविण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes