SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार: जिल्हाधिकारी अमोल येगडेपावनखिंड परिसरात 'मेरा युवा भारत' तर्फे स्वच्छता श्रमदानपेट्रोल-डिझेल साठेबाजी व काळाबाजारावर कडक बंदी; नियमभंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईप्रवाशांची तृष्णा भागणार! वाठार बस डेपोत सामाजिक भावनेतून 'पाणपोई' कार्यान्वितमुंबईत स्वतंत्र नाट्यगृह व चित्रपटगृह उभारणार : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारकोल्हापूर महापालिकेच्यावतीने जागतिक क्षयरोग दिन विविध उपक्रमांनी साजरासाखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीतइंधन टंचाईच्या चर्चा केवळ अफवा; कोल्हापुरात 'पॅनिक बायिंग' टाळण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे स्पष्ट निर्देशमान्सूनपूर्व नाले व चॅनल सफाई मोहिमेला सुरुवात; ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन"बिद्रीत गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; फॉर्च्युनरसह १२ लाखांची रोकड जप्त!"

जाहिरात

 

पावनखिंड परिसरात 'मेरा युवा भारत' तर्फे स्वच्छता श्रमदान

schedule24 Mar 26 person by visibility 109 categoryराज्य

कोल्हापूर : 'शहीद दिना'चे औचित्य साधत युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार 'मेरा युवा भारत' (MY Bharat) कोल्हापूरच्या वतीने ऐतिहासिक पावनखिंड परिसरात 'स्वच्छता श्रमदान' उपक्रम उत्साहात पार पडला. या मोहिमेद्वारे तरुणांनी ऐतिहासिक वारसा स्थळांच्या जतन आणि स्वच्छतेचा संदेश दिला.

क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पावनखिंड परिसरातील प्लास्टिक कचरा, निर्माल्य आणि अन्य कचरा गोळा करून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. केवळ स्वच्छताच नव्हे, तर ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य राखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या विशेष मोहिमेसाठी जिल्हा युवा अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी शिस्तबद्ध पद्धतीने हे श्रमदान पूर्ण केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी समन्वयक निलेश कांबळे आणि संकेत गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes