SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कांचनताई परुळेकर यांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली - महापौर रूपाराणी निकम; स्मृतीदालनाचे उद्घाटनसुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार: जिल्हाधिकारी अमोल येगडेशिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात 'आजी-माजी विद्यार्थी-पालक मेळावा' उत्साहातघरफाळा दंड सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 1.22 कोटींची वसुलीहत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत" योजना प्रभावीपणे राबवा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरसावधान! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; बळीराजाची धाकधूक वाढली!'सहज सेवा ट्रस्ट'चे ज्योतिबा डोंगरावर सलग २६ व्या वर्षी भव्य अन्नछत्र; यंदा दोन लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे शनिवारी 'अर्थ अवर'चे आयोजनमाती आधारित शिक्षणाने विश्वाचे कल्याण शक्य : मल्लिकार्जुन कोरी; केआयटी मध्ये कै.शिवाजीराव देसाई व्याख्यानमाला संपन्न.

जाहिरात

 

घरफाळा दंड सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 1.22 कोटींची वसुली

schedule26 Mar 26 person by visibility 109 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या घरफाळा दंड सवलत योजनेला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत एकूण 465 मिळकतधारकांनी लाभ घेतला असून, आज दिवसभरात 1 कोटी 22 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सुमारे 38 लाख 85 हजार रुपयांची दंडव्याजामध्ये सवलत मिळाली आहे.

महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेली ही सवलत योजना दि. 26 ते 31 मार्च 2026 या कालावधीत लागू असून, थकबाकीदारांना मोठा दिलासा देणारी ठरत आहे. महासभेतील ठरावानुसार व महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्या सूचनेनुसार तसेच आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेनुसार निवासी व अनिवासी मिळकतींसाठी दंडव्याजावर 80 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत थकबाकीदारांनी चालू मागणीसह संपूर्ण थकबाकी एकरकमी भरल्यास दंड व विलंब आकारामध्ये सवलत मिळणार आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाच्या थकीत पाणी बिलाची रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील विलंब आकारातही सवलत दिली जात आहे. चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर अद्याप न भरलेल्या मिळकतधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी दि. 28 ते 31 मार्च 2026 या कालावधीत सुट्टीच्या दिवशीही महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच घरफाळा भरण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर, अँड्रॉइड मोबाईल अ‍ॅपवर तसेच नागरी सुविधा केंद्रांतील किओस्क यंत्रांवर ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुगल पे, फोन पे, अ‍ॅमेझॉन पे यांसारख्या यूपीआय माध्यमांतूनही कर भरणा करता येणार आहे.


महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व मिळकतकर थकबाकीदारांनी या सवलत योजनेचा लाभ घेऊन आपली थकबाकी तत्काळ भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes