SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्यारूपाने वैयक्तिक मित्र गमावला क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरवनगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचाआयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावाभाजपा महिला, युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जाहीर निषेधनाविन्याचा शोध घ्या : डॉ. रत्नाकर पंडित; ग. गो. जाधव अध्यासनात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहातशिक्षणशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी व पालक मेळावा उत्साहात कोल्हापुरात १५ मार्च रोजी 'विधी सेवा महाशिबिर'; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावाए.एन.एम. प्रथम वर्ष शपथविधी समारंभ उत्साहात येत्या गुरुवारी 'इग्नाईट महाराष्ट्र' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन“सत्यजित चषक २०२६”चा बादशहा एफसी (पुणे) मानकरी

जाहिरात

 

नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचाआयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला आढावा

schedule23 Feb 26 person by visibility 79 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर :महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आज आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. ही बैठक सकाळी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांनी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, थकबाकीधारकांच्यावर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या. मोठ्या थकबाकीदार मिळकतींवर संबंधित विभागांनी तातडीने नोटिसा बजावून बोजा नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

   नगररचना विभागाने आज अखेर उर्वरित कालावधीत 100 कोटींच्या पुढे नेण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. घरफाळा विभागाने मोठ्या थकबाकीदारांशी थेट संपर्क साधून वसुली करावी, तसेच नोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. शासकीय थकबाकी असलेल्या विभागांशी पाणी पुरवठा, घरफाळा विभागाने समन्वय साधून रक्कम वसूल करण्याचे निर्देशही देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाने मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांचा पाणीपुरवठा खंडित करावा. ग्रामपंचायतींच्या थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले. इस्टेट विभागाची वसुली कमी झाली असून थकबाकीदारांचे दुकानगाळे सील करावेत. जे गाळे रिकामे आहेत त्याची जाहिरात काढावी अशा सूचना केल्या.

   यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाअधिकारी राजश्री पाटील, सहा-आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार एन एस पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, रचना व कार्यपद्धती अधीक्षक प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, कनिष्ठ अभियंता अमित दळवी, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes