SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामध्ये सामंजस्य करारगिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा : प्रकाश आबिटकरपीएम ई-बस योजनेतील पायाभूत सुविधांची कामे तांतडीने पूर्ण करा : प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांचे निर्देशकोल्हापूर महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात नागरीकांना पहावयास मिळणार मतदार यादी त्याग, समर्पणातूनच सर्वोच्च शिखरावर पोहोचता येते : मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघीणीचे यशस्वीरीत्या नैसर्गिक जंगलात मुक्ती चा प्रयोग यशस्वी वारसा हा दगड-विटांचा समूह नसून अस्मितेचे प्रतीक : श्रीमंत नंदिता घाटगेमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 23 नोव्हेंबर रोजी सेवा निवृत्त जवांनासाठी हयात दाखला मेळावाबांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये नोकरीची संधी

जाहिरात

 

पीएम ई-बस योजनेतील पायाभूत सुविधांची कामे तांतडीने पूर्ण करा : प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांचे निर्देश

schedule20 Nov 25 person by visibility 81 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेस केंद्र शासनाच्या पीएम ई-बस योजनेमधून मंजूर झालेल्या 100 ई बसेसच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांच्या उभारणीचे कामकाज के.एम.टी.च्या शास्त्रीनगर येथील मुख्य यंत्रशाळेमध्ये सुरु आहे.  या कामकांजाचा आढावा आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला.

यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पायाभूत सुविधांमधील एलटी लाईनचे काम प्राधान्याने करुन चार्जिंग स्टेशन उभारणीला वेग देणे, तसेच स्थापत्यविषय कामे, संरक्षक भिंत, पेव्हमेंट काँक्रीटीकरण करणे, तसेच बस ऑपरेटर यांना पहिल्या टप्प्यातील बसेस सुरु करणेकरितां द्यावयाच्या सुविधांची सर्व कामे तांतडीने पुर्ण करण्याचे निर्देश दिले.

 एलटी लाईनमधील सिव्हील वर्कचे पॅनेल व मिटर रुमचे काम पुढील 10 दिवसात पूर्ण करुन एलटी लाईनचे दोन ट्रान्स्फॉर्मर व ब्रेकर पॅनेल पुढील 15 दिवसांत बसवून ते कार्यान्वित करणेसाठी संबंधीत ठेकेदार यांना सूचना दिल्या. दक्षिण बाजूला असणारी संरक्षक भिंत दुरुस्त करणेसाठी तेथे असणारे आरोग्य विभागाचे स्क्रॅप मटेरियल लिलावाद्वारे तांतडीने निष्कासीत करण्याचे आदेशही यावेळी दिले. 

 पायाभूत सुविधांमधील केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या निधीचा सविस्तर आढावा घेऊन अप्राप्त निधीसाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्याचे निर्देश प्रशासकांनी दिले.  तसेच, पुढील टप्प्यातील निधी प्राप्त होणेसाठी व अनुदान वितरीत करणेसाठी स्पर्श प्रणाली नोंदीकृत होणेसाठी केंद्र शासनाचे प्रकल्प संचालक व अपर मुख्य सचिव, नगरविकास विभाग यांच्याकडे समक्ष बैठक आयोजित करुन निधीसाठी प्रयत्न करणेबाबत सूचना दिल्या. 

संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतलेनंतर पहिल्या टप्प्यातील बसेस सुरु होणेच्या दृष्टीने तांतडीने 14 चार्जिंग स्टेशन्स उभारणी करणे व सिव्हील डेपो डेव्हलपमेंट व एलटी-एचटी लाईनचे काम डिसेंबर 2025 अखेर पूर्ण करणेचे संबंधीत ठेकेदाराला निर्देश दिले.

 या बैठकीस उप आयुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, अति.परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी पी.एन. गुरव, सहा.अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता (विद्युत) अमित दळवी, प्रकल्प सल्लागार प्रशांत हडकर, जोशी असोसिएटस्, ठेकेदार निलेश पाटील व किरण घुमे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes