SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेच्यावतीने तावडे हॉटेल परिसरातील 11 अतिक्रमणावर कारवाई‘गोकुळ’ची म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ...स्टार्टअप्सनी भारत सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : डॉ. सी. एस. यादव; केआयटी आय.आर.एफ. च्या कोहॉर्ट-२.0 या उपक्रमाचे उद्‌घाटननांदगाव येथे कृषी विषयक ग्राम परिसंवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनशाही दसरा महोत्सव: विजेत्यांना बक्षीस वितरण, उत्कृष्ट कामांचाही सन्मानआरटीओकडून कारवाईपोटी 2 लाखाचा दंड वसूलजांभळी गावाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात हिरवाई निर्माण करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगेछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास प्रशासनाची परवानगीमाफक दरात, सुंदर कलाकृतींचा लाभ नागरिकांनी घ्यावा : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर शहरात अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या लाईनवर नागरीकांनी आपली नळ कनेक्शन शिफ्ट करावी; अन्यथा...

जाहिरात

 

डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटीचे कुलपती डॉ. संजय डी पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

schedule31 Oct 23 person by visibility 688 categoryशैक्षणिक

कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने संशोधनाचा वापर सर्वसामान्यासाठी व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. नव्याने सुरू होत असलेले ‘डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी' केंद्र वैज्ञानिक ज्ञान समाजापर्यंत पोहचविण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.

 डी. वाय. पाटील गुपचे संस्थापक पद्मश्री आदरणीय डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये  ‘डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’चा प्रारंभ कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजने आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या संशोधनामुळे संस्थेच्या नावलौकीकात अधिकच भर पडली आहे. नव्याने स्थापन झालेल्या 'डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबीलीटी" च्या माध्यमातून हे संशोधन व विज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी हे केंद्र महत्वाची भूमिका बजावेल.
     
  रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रा. सी. डी. लोखंडे यांनी प्रास्तविकामध्ये गेल्या काही वर्षामध्ये विद्यापीठाने संशोधनामध्ये घेतलेली झेप व विभागाच्या इतर उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.

 संशोधक डॉ. जयवंत गुंजकर यांनी केंद्राच्या उद्देशांची माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक शिक्षणाची गोडी निर्माण करणे, देशभरातील संशोधकांना एकत्र आणून सुसंवाद साधणे, वैज्ञानिक क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान समाजातील प्रत्येक घटकापर्यत पोहचविणे, विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्तीस चालना देणे, प्रथमोपचाराबद्दलची प्रशिक्षण देणे, पौगंडावस्थेतील आरोग्यविषयक माहिती पुरविणे, समाजाच्या गरजा आणि समस्या ओळखण्यासाठी आणि वैज्ञानिक आणि तांत्रिक उपाय विकसित करण्यासाठी सहयोग करणे इत्यादी उद्देश ठेऊन हे केंद्र काम करणार असल्याचे त्यानी सांगितले. 

  कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल म्हणाले, यूजीसी, डीएसटी-एसईआरबी च्या धोरणामध्येही सामाजिक जबाबदारीचे महत्व नमूद करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून वैज्ञानिक ज्ञान समाजापर्यंत पोहचविण्यास मदत होईल. 

यावेळी  विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉ.  व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.  राकेश शर्मा,  उपकुलसचिव संजय जाधव, डॉ. मेघनाद जोशी, सिआयआर विभागाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संशोधक विदयार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes