कोल्हापूर शहरात अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या लाईनवर नागरीकांनी आपली नळ कनेक्शन शिफ्ट करावी; अन्यथा...
schedule16 Oct 25 person by visibility 163 categoryमहानगरपालिका

▪️शिफ्टींगसाठी दिनांक 17 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2025 या एक महिन्याची मुदत
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत कोल्हापूर शहरात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामांतर्गत काही भागांमध्ये नवीन पाण्याच्या लाईन्स टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये काही भागांमध्ये नवीन टाकलेल्या पाण्याच्या लाईन्स व जुन्या पाण्याच्या लाईन्समधून एकत्रित पाणीपुरवठा सुरू असलेने योग्य त्या दाबाने पाणीपुरवठा होत नसलेचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अमृत योजनेअंतर्गत नवीन टाकलेल्या पाईपलाईनवर जुन्या पाईपलाईनची कनेक्शन शिफ्ट करणे आवश्यक आहे. जुन्या लाईनवरील पाणीपुरवठा काही दिवसात बंद करण्यात येणार आहे.
त्यामुळे ज्या ठिकाणी नवीन पाईपलाईन व जुनी पाईपलाईन सुरू आहे अशा ठिकाणी फक्त नवीन पाईपलाईन सुरू ठेवण्यात येणार असून जुनी पाईपलाईन बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या नळ कनेक्शनधारकांची नळ कनेक्शन अदयापही जुन्या पाईपलाईनवर आहेत त्यांनी आपली नळकनेक्शन अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या नवीन पाईपलाईन्स वर दिनांक17 ऑक्टोंबर 2025 ते दिनांक 17 नोव्हेंबर 2025 या एक महिन्याच्या कालावधीमध्ये स्वखर्चाने शिफ्ट करून घ्यावे. एक महिन्याच्या कालावधीनंतर जुनी पाईपलाईन पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये जे नळ कनेक्शनधारक नविन पाईपलाईनवर आपले कनेक्शन ट्रान्सफर करुन घेणार नाहीत त्यांना जुनी पाईपलाईन बंद केलेनंतर नळाचा पाणी पुरवठा पुर्णत: बंद होणार आहे. याची संबंधीत नागरिकांनी नोंद घ्यावी व आले नळ कनेक्शन नविन अमृत योजनेच्या पाईपलाईनवर ट्रान्सफर करुन घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.