डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्रणवला राज्य नेमबाजी स्पर्धेत कास्य
schedule12 Dec 24 person by visibility 196 categoryक्रीडा
कोल्हापूर : डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा 11 वी सायन्सचा विद्यार्थी प्रणव मुकुंद पवार याने राज्य शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत कास्य पदकाची कमाई केली. या विजयामुळे प्रणवची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन व संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथे ही स्पर्धा झाली. प्रणवने १९ वर्षाखालील गटात ओपन साईट प्रकारात हे यश मिळविले आहे.
काॅलेजचे प्राचार्य ए.बी.पाटील, क्रिडा शिक्षक प्रा.सुदर्शन पोवार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डाॅ.संजय डी. पाटील,उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील व विश्वस्त मा. आमदार ऋतुराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.