मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा
schedule08 Aug 26 person by visibility 189 categoryराज्य
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.55 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.05 वाजता मोटारीने आष्टा, ता. वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण.
दुपारी 12.50 वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 1.20 वाजता यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आगमन व आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 1.35 वाजता मोटारीने छत्रपती ताराराणी पोलीस गृह संकुल, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा कोल्हापूर कडे प्रयाण. दुपारी 1.40 वाजता छत्रपती ताराराणी पोलीस गृह संकुल, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा कोल्हापूर येथे आगमन. दुपारी 1.45 वाजता छत्रपती ताराराणी पोलीस गृह संकुल येथील नूतन निवासी इमारतींचा उद्घाटन समारंभ. दुपारी 2 वाजता मोटारीने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, येथे आगमन. दुपारी 2.15 वाजता छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या नुतनीकृत इमारतीचा लोकार्पण सोहळा. दुपारी 2.30 वाजता मोटारीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाकडे प्रयाण. दुपारी 2.35 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे आगमन व दर्शन. दुपारी 2.45 वाजता मोटारीने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूरकडे प्रयाण.
दुपारी 2.50 वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, येथे आगमन व संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा. दुपारी 3.05 वाजता प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे आगमन व कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा. दुपारी 4.25 वाजता मोटारीने बॅ. खर्डेकर चौक, कागल जि. कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 4.50 वाजता मोटारीने बॅ. खर्डेकर चौक, कागल येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पृर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व हिंदूराव घाटगे विद्यामंदीर नुतनीकृत शाळेचा लोकार्पण सोहळा ( सभास्थळ- छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर, निपाणी वेस, कागल). सायंकाळी 6.15 वाजता मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. सायंकाळी 6.40 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. रात्री 8.50 वाजता विमानाने नवीन मुंबईकडे प्रयाण.