SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सहकार क्षेत्रात मोठी खळबळ : गोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ व नारायण परजने यांच्याविरुद्ध ‘सु- मोटो’ अवमान कारवाईचे आदेश अग्निवीर भरती मेळावा अनुषंगाने आढावा बैठक संपन्न डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे 'इंडक्शन प्रोग्राम'द्वारे उत्साहात स्वागतकोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 6 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईप्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शनईद फेस्टिवल भव्य इस्लामिक क्विझ कॉन्टेस्ट; दिवाळी सुट्टीनंतर रंगणार स्पर्धागतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखल

जाहिरात

 

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

schedule25 Jul 26 person by visibility 439 categoryदेश

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. नीट (NEET-UG) परीक्षेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. ३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-युजी परीक्षेत अनियमितता आढळल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता आणि परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षेची घोषणा केली होती. याशिवाय, पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता.
२१ जून २०२६ रोजी २0 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडली आणि १६ जुलै रोजी निकालही जाहीर झाला. मात्र, गेल्या १० दिवसांत जंतरमंतरसह देशभरात पेटलेल्या आंदोलनामुळे आणि राष्ट्रविरोधी शक्तींकडून या परिस्थितीचा गैरफायदा घेतला जाऊ नये, तसेच विद्यार्थ्यांचे भविष्य कोलमडू नये म्हणून आपण नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  देशाच्या युवा पिढीच्या आकांक्षा आणि न्यायोचित अपेक्षांचा आपण आदर करत असल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. परीक्षा माफियांच्या विळख्यातून गुणवान विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याशी खेळ होऊ नये म्हणून आपण कधीही पाठ फिरवली नसल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले.
 या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी देशपातळीवर आक्रमक पवित्रा घेतला असून, बिहारसह अनेक भागांत तीव्र आंदोलने उसळली आहेत. राष्ट्रसेवा हीच आपल्या आयुष्याची सर्वोच्च प्राथमिकता असून, ओडिशाची जनता आणि देशाच्या तरुणांच्या विकासासाठी आपण पुढेही कटिबद्ध राहणार असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी नमूद केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes