+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustयुपीएससी परिक्षेत झळकले सारथीचे २० विद्यार्थी adjustलोकसभा निवडणूक 2024 : गुरुवारी कोल्हापूरसाठी 12 उमेदवारांनी 16 तर हातकणंगलेसाठी 14 उमेदवारांनी 17 नामनिर्देशनपत्रे केली दाखल adjustयशवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार समारंभ उत्साहात adjustघरफाळा विभागाच्यावतीने 1 लाख 58 हजार 500 बिले जनरेट adjustभारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ adjustलोकसभा निवडणूक 2024 : माढ्यातील उमेदवाराची अर्ज भरण्यासाठी चक्क रेड्यावरुन एन्ट्री adjustघोडावत विद्यापीठातील कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustपरगावी असणाऱ्या कोल्हापूरकरांनी 7 मे रोजी मतदानासाठी येण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी, अमोल येडगे यांचे आवाहन adjustदुग्ध व्यवसायामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती : अरुण डोंगळे; कुशिरे येथे दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी प्रदान करण्याचा कार्यक्रम adjustआरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
Photo_1712720584815~2
Photo_1711784304922~2
SMP_news_Gokul_ghee
schedule30 Jan 24 person by visibility 2069 categoryसामाजिक
कोल्हापूर : डिजिटल मिडिया संपादक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर झाले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्यामध्ये युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांना डिजिटल स्टार ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृष्णराज महाडिक यांचा शाल, श्रीफळ आणि पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

 कृष्णराज हे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र असून, बालवयातच त्यांनी कार रेसिंगच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले. त्यानंतर देश-विदेशात झालेल्या अनेक कार रेसिंग स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी करत, लक्षवेधून घेतले. गेल्या काही वर्षात सोशल मिडियावर ते प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यांचे व्लॉग वाचणार्‍यांची संख्या कोटीच्या घरात आहे. कोल्हापूरसह राज्यभर आणि देशातही तरूणाईमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. विशेष म्हणजे सोशय मिडियावर पोस्ट टाकून त्यातून मिळणारे उत्पन्न त्यांनी कष्टकरी, गरजू आणि वंचित लोकांसाठी खर्च केले आहेत. त्यामध्ये निराधारांना अन्न, औषधे आणि कपडे वाटप, पावसामुळे घर पडलेल्या वृध्देला नवीन घर बांधून देणे, साडी वाटप, उबदार ब्लँकेट वाटप, रिक्षाचालकांना दरवाजे आणि मीटर वाटप असे शेकडो उपक्रम कृष्णराज यांनी आजपर्यंत राबवले आहेत.

 त्याशिवाय शहर सुशोभिकरणासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. तरूण वयातच समाजाप्रती संवेदनशिलता आणि कणव बाळगणार्‍या या युवा व्यक्तीमत्वाला डिजिटल स्टार ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल कृष्णराज महाडिक यांचे विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.