SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळाभाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या : सतेज पाटील ‘गोकुळ’ कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ; पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीविद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 'केआयटी' प्रशासन खंबीर; दोषी प्राध्यापकावर तातडीने निलंबनाची कारवाई!महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमइंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

जाहिरात

 

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळा

schedule07 Mar 26 person by visibility 69 categoryराज्य

कोल्हापूर: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, स्त्री अभ्यास केंद्र, लेडीज हॉस्टेल, बेटी बचाओ अभियान, अंतर्गत तक्रार समिती, श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, शिक्षणशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ मार्च २०२६ रोजी ‘राईटस, जस्टिस, अँण्ड अँक्शन फॉर ऑल गर्ल्स अँण्ड वुमेन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात सकाळी ११ ते ३ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. (डॉ). सुरेश गोसावी भुषविणार असुन, नँकचे सल्लागार (बेंगलोर) डॉ. जगन्नाथ पाटील यांचे बीजभाषण होणार आहे. यावेळी प्रभारी कुलगुरु प्रा. (डॉ). ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती आहे. 
‘महिलांचे हक्क, न्याय व कृति’ ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या विषयांवर डॉ. ज्योती शेटे (स्कूल ऑफ लॉ जेएसपीएम विद्यापीठ, पुणे), प्रा.(डॉ).प्रविण पाटील, (प्राचार्य, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर), डॉ. राधेश्याम जाधव (सहसंपादक, द हिंदू बिझनेस लाईन, पुणे), डॉ. विजय चोरमारे, (जेष्ठ संपादक, पुणे) कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा विनामुल्य असुन कार्यशाळेच्या आधी राजर्षी सभागृहात नोंदणी करणे आवश्यक आहे.

 सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. निशा मुडे-पवार यांनी संयोजकांच्या वतीने केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes