SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिवशाही पुनर्वसन' प्रकल्पाला बळकटी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमिशन लक्षवेध अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकासघरगुती-व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना निर्देशट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील जीएसटी रद्द करावा, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणीपायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी यशस्वीरीत्या संपन्नकोल्हापूर : घरफाळा सवलत योजना 80 टक्के सवलतीचा शेवटचा दिवसमहाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अर्थसहाय्य योजनापी. एम. सूर्यघर योजना संपूर्ण जिल्हाभर राबविणार : मंत्री हसन मुश्रीफ 'सेवर्ड्स फॉली': एका 'मूर्खपणाच्या' कराराने अमेरिकेला कसं बनवलं महासत्ता?सांगरुळ येथील सराफ लूटप्रकरणी कोल्हापूर गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात

 

घरगुती-व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना निर्देश

schedule30 Mar 26 person by visibility 92 categoryराज्य

 कोल्हापूर : जिल्ह्यात अचानक वाढलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटना आणि गॅस पुरवठादार कंपन्यांची बैठक पार पडली. यावेळी घरगुती सिलेंडरचा शंभर टक्के घरपोच पुरवठा, औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंट्ससाठी उपलब्धतेनुसार वितरण आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी पाईपद्वारे गॅस जोडण्या देणे यावर चर्चा झाली.

  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गॅस एजन्सींना ग्राहकांना पूर्णपणे घरपोच गॅस सिलेंडर वितरीत करण्याचे कडक निर्देश दिले. कुठेही अवैध विक्री किंवा पुरवठा होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. आवश्यकतेनुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस आणि पुरवठा शाखेची मदत घेऊन नियंत्रण राखण्याचेही त्यांनी सांगितले.

  बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले, माजी अध्यक्ष आयुषचंद्र धोतरे, गोशिमाचे उपाध्यक्ष संजय देशिंगे यांच्यासह एचपी, भारत गॅस आणि इंडेन गॅस कंपन्यांचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत कंपन्यांनी घरगुती सिलेंडरचा पुरवठा पूर्वपदावर येत असल्याचे सांगितले, तर व्यावसायिक गॅसचे २० टक्के वाटप शनिवारपासून सुरू झाल्याची माहिती दिली.

  कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील औद्योगिक व्यवसाय, हॉटेल व रेस्टॉरंट्स आणि पर्यटकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता शासनाच्या सूचनांनुसार आणि उपलब्ध पुरवठ्यानुसार २० टक्के मर्यादेत व्यावसायिक सिलेंडर सुरळीत वितरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्यांना निर्देश दिले. सद्या वापराच्या मर्यादेतील २० टक्के पुरवठा चालू ठेवण्याचे आणि उपलब्धतेनुसार त्यात वाढ करण्याचे कंपन्यांनी मान्य केले.

  जिल्हाधिकारी यांनी औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंट्सना पाईपद्वारे गॅस पुरवठा देण्यास प्राधान्य देण्याचे सांगितले. यासाठी दोन्ही महानगरपालिकांशी चर्चा करून माहिती द्यावी आणि आवश्यक कामांसाठी डीम्ड परवानग्या देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विविध उद्योग व व्यवसायांतील कामगार व परप्रांतीयांसाठी ५ किलोचे गॅस पुरवठा सुरू ठेवावा आणि संबंधित कंपन्यांनी त्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

  कोणत्याही परिस्थितीत चुकिच्या पद्धतीने गॅस पुरवठा, ब्लॅकमार्केटिंग, बुकिंगशिवाय किंवा ओटीपीशिवाय वितरण असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी यांनी इशारा दिला. शंभर टक्के घरगुती गॅस घरपोच पोहोचवण्याचे पुन्हा एकदा सांगितले. या बैठकीतून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की, घरपोच सिलेंडर मिळत असल्याने कळविलेल्या तारखेपूर्वी एजन्सीजकडे गर्दी करू नये. दिलेल्या वेळेनुसार गॅस घरपोच देण्यात येत आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes