खानदेश पत्रकार संघाचे वतीने डॉ सुनीलकुमार सरनाईक यांचा सत्कार
schedule16 Feb 25 person by visibility 464 categoryराज्य

धुळे : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने सा.करवीर काशीचे संपादक व खानदेश पत्रकार संघाचे प्रमुख सल्लागार डॉ सुनीलकुमार सरनाईक यांना काॅ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेबद्दल खानदेश पत्रकार संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर सुर्यवंशी यांच्या हस्ते शाल व संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी साप्ताहिक शोधन चे कार्यकारी संपादक शहाजहान मगदूम, माध्यम व्यवस्थापक श्रीकांत हिरवे, निवृत्त वाहन निरीक्षक रमेश सरनाईक, कवयित्री लेखिका स्वाती गोसावी /पुरी,जेष्ठ समीक्षक प्रशांत वाघ,आत्मा मालिकचे गझलकार राम गायकवाड गायकवाड,
अध्यक्ष राजेंद्र उदागे आदी उपस्थित होते.