SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नेदरलँड्समधील इरॅस्मस मेडिकल सेंटर सोबत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सामंजस्य करारपालकमंत्री थेट शेताच्या बांधावर; 'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत केली भात लावणी‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणीप्रा. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात १५ जुलैला व्याख्यानजागतिक रॉक डे: संगीताच्या दुनियेतील बंडखोर आणि ऊर्जेचा महासोहळा!आषाढी यात्रेसाठी एस.टी. महामंडळाची मोठी घोषणा: ५,५०० विशेष बसेस धावणार!कोल्हापुरात हायप्रोफाईल ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश: व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे चालायचा काळा धंदा; करवीर पोलिसांची धडक कारवाई!नागपुरात गृहस्वप्न होणार साकार: ५०० सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार नियुक्तीची संधी!महाराष्ट्र लवकरच होणार ‘रेल्वे फाटकमुक्त’; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणाराजर्षी शाहू स्मारक भवनातील तांत्रिक त्रुटी दूर; 'हम साथ साथ है' कराओके कार्यक्रम उद्या रंगणार

जाहिरात

 

नेदरलँड्समधील इरॅस्मस मेडिकल सेंटर सोबत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सामंजस्य करार

schedule13 Jul 26 person by visibility 85 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि नेदरलँड्समधील जागतिक दर्जाच्या इरॅस्मस मेडिकल सेंटर, रोटर्डम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांसाठी जागतिक स्तरावरील संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या वैद्यकीय जैवतंत्रज्ञान, स्टेम सेल्स व पुनरुत्पादक वैद्यकशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे -तिवारी यांनी १५ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत नेदरलँड्समधील इरॅस्मस मेडिकल सेंटर येथे शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी  भेट दिली.  या भेटीदरम्यान विविध संशोधन प्रयोगशाळांना भेटी, संशोधकांशी संवाद आणि भविष्यातील संयुक्त संशोधनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी हा सामंजस्य करार करण्यात आला. 

याबाबत डॉ. अर्पिता पांडे तिवारी म्हणाल्या,  या भेटीदरम्यान झालेला सामंजस्य करार हा दोन्ही संस्थांसाठी महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त संशोधन, विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, शैक्षणिक सहकार्य तसेच नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना चालना मिळणार आहे. 

डॉ. तिवारी यांनी कार्बन क्वांटम डॉट्स, नॅनोबायोटेक्नॉलॉजी, बायोसेंसर, कर्करोगाचे प्रारंभिक निदान आणि वैद्यकीय निदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकास यावर संशोधन केले आहे. त्यांनी विविध  आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये संशोधन लेख प्रकाशित केले असून त्यांच्या नावावर अनेक पेटंट्स आहेत. त्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, , कुलगरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे  यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes