प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे निधन
schedule16 Dec 24 person by visibility 168 categoryदेश
नवी दिल्ली : प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
जगभरात शास्त्रीय संगीतात भारताला एक वेगळी ओळख मिळवून देणारे उस्ताद आणि प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन आता आपल्यात नाहीत. झाकीर हुसेन यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. झाकीर हुसेन यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन हे उच्च रक्तदाबाचे रुग्ण होते. त्यामुळे त्यांना हृदयाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.
झाकीर हुसैन त्यांना 'आयडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस' नावाचा दुर्मिळ फुफ्फुसाचा आजार झाला होता, ज्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली होती, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.