SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलारसांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूरहिंदू जन संघर्ष समितीच्या उपोषणाची ११ व्या दिवशी भिडे गुरुजींच्या उपस्थितीत सांगता दूरशिक्षण, ऑनलाईन शिक्षण आजची गरज: डॉ. विलास शिंदे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करुया : जिल्हाधिकारी अमोल येडगेकितीही स्थित्यंतरे आली तरी चित्रपटाचे ‘स्टोरीटेलिंग’ कायमच: डॉ. जब्बार पटेलदुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट, शैक्षणिक साहित्य वाटपभुदरगड तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजनराज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज कराउखळु धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी; हिरवागर्द निसर्गसौंदर्याची पर्यटकांना साद...

जाहिरात

 

शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोमवार 21 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी निर्धार परिषद

schedule13 Oct 24 person by visibility 826 categoryराज्य

कोल्हापूर : राज्य शासनाने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची ऑनलाइन मीटिंग नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये घ्यायचा निर्णय घेण्यात आला. सोमवार 21 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी बारा वाजता ही परिषद होणार आहे. अशी माहिती आयोजित पत्रकार बैठकीमध्ये देण्यात आली. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, समन्वयक गिरीश फोंडे यांनी माहिती दिली
                                              
गोवा ते नागपूर अशा 805 किलोमीटर लांबीच्या 86 हजार कोटी नियोजित खर्चाचा शक्तीपीठ महामार्ग हुकूमशाही पद्धतीने लादण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने 28 फेब्रुवारी व 7 मार्च 2024 च्या गॅझेट नोटिफिकेशन द्वारे घेतला. याच दिशेला जाणारे पर्यायी दोन महामार्ग असताना या अनावश्यक अशा शक्तिपीठ महामार्गाची योजना सरकारने केली. या महामार्गामुळे 27 हजार एकर जमीन 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जाणार आहे. कोल्हापुरातील 5 281 एकर जमीन ही संपादित केली जाणार आहे. मार्च महिन्यापासूनच कोल्हापुरातील शेतकरी हे अत्यंत आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. 4 एप्रिल रोजी सर्वपक्षीय निर्धार मेळावा घेऊन या विरोधात एकत्रित लढण्याचा निर्धार झाला. सर्वप्रथम कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर 11 मार्च रोजी व नंतर 18 जून रोजी भव्य मोर्चा काढून शेतकऱ्यांनी सरकारला इशारा दिला होता. मंत्र्यांना कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस व जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलनाचा धसका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मीटिंग पार पडल्या. कोल्हापुरातील सहा तालुक्यांमध्ये या विरोधात जनजागृती मिळावे व रास्ता रोको आंदोलने झाली. एवढ्या सर्व गोष्टी घडत असताना देखील फक्त शब्दांची फिरवा फिरव करण्यापलीकडे माहिती सरकारने कोणतीच ठोस भूमिका घेतली नाही. याबद्दल कोल्हापूर सहित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मध्ये असंतोष खदखदत आहे.

आता महायुती सरकारचा कार्यकाळ संपत असताना आचारसंहिता ही दोन दिवसांमध्ये लागू होण्याची परिस्थिती असताना सरकार हे सवंग लोकप्रियतेसाठी वोट बँक नजरेसमोर ठेवून शेकडो निर्णय घेत मंत्रिमंडळ बैठकांचा सपाटा लावला आहे. सरकारची तिजोरी खाली असताना देखील सात लाख कोटीचे कर्ज राज्यावर असताना देखील सरकार जनतेतील आपली भ्रष्टाचारी प्रतिमा खोडून काढण्यासाठी अनेक घोषणांचा पाऊस पडत आहे. पण लाडक्या कंत्राटदारांचे हे सरकार शेतकऱ्याला मात्र सावत्र भावाची वागणूक देत आहे.

 शेतकऱ्यांची उदरनिर्वाहाच्या जमिनी काढून व त्यांस आत्महत्येस प्रवृत्त करायला लावून शेतकरी महिलांच्या कपाळवरील कुंकू पुसण्याचे काम हे सरकार करत आहे. शेतकरी बहिणी या लाडक्या बहिणी नाहीत का ? असा सवाल शेतकरी करत आहे. त्यामुळे आता शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी हे निर्णायक भूमिका घ्यायच्या तयारीत आहेत. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोमवार 21 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी निर्धार परिषद होत आहे.

या परिषदेसाठी संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी नेते व महाराष्ट्रातील विविध राजकीय विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

या परिषदेमध्ये खा. शाहू महाराज, आ.सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत, राजाराम सिंह , कृषी अभ्यासक योगेंद्र यादव, माजी आमदार संजय बाबा घाटगे, आ. विश्वजीत कदम, खा.विशाल पाटील, आ.अरुण लाड, आ. ऋतुराज पाटील, आ. राजू बाबा आवळे, किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, माजी आमदार के पी पाटील , दत्त सहकारी साखर कारखान्याचे गणपतराव पाटील, विजय देवणे, आर के पवार यासह बारा जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्थित असतील. तसेच खासदार शरदचंद्र पवार साहेब व शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण दिले जाणार आहे.
अजून देखील वेळ गेलेली नाही आचारसंहितेपूर्वी हा महामार्ग रद्द केल्याची व भूमी संपादन देखील रद्द केल्याची लेखी अधिसूचना काढावी. बारा जिल्ह्यातील इंडिया आघाडीचे व महाविकास आघाडीचे सर्व आमदारांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात भूमिका घेतली आहे त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी व इतरही शेतकरी यांच्या मनात त्या आमदारांबद्दल सहानुभूती असणे नैसर्गिक आहे. त्या सर्व आमदारांचे खासदारांचे आम्ही शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने आभार मानत आहोत व शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबत राहावे अशी आशा व्यक्त करीत आहोत. 

 या पत्रकार परिषदेस सम्राट मोरे,शिवाजी मगदूम,आनंदा पाटील, प्रकाश पाटील, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी कांबळे, सुधाकर पाटील,शिवाजी पाटील, युवराज शेटे, योगेश कुळवमोडे, नितीन मगदूम, दादासो पाटील, युवराज कोईंगडे, मच्छिंद्र मुगडे, जालिंदर कुडाळकर, साताप्पा लोंढे ,तानाजी भोसले , आनंदा देसाई आधी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes