SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावोगावी मोफत आरोग्य शिबिरेजीवनगौरव पुरस्काराबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचा यड्रावकर कुटुंबाकडून सत्कारआंतरराष्ट्रीय अनुवाद दिन: संस्कृतींना जोडणारा भाषिक सेतूगेल्या ५ वर्षांच्या काटकसरी कारभारावर ठरावधारकांचा विश्वास : आमदार सतेज पाटीलगोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीरच्या राजकारणात नवा ट्विस्टकसबा बावडा येथे 'कबाड से जुगाड' बाल विद्यार्थी कार्यशाळा उत्साहात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा : राज्यपाल जिष्णु देव वर्माराज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शनअसोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट महाराष्ट्रचे ४७ वे वार्षिक 'मॅपकॉन' अधिवेशन कोल्हापुरातस्वाईन फ्ल्यूबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी : आरोग्य विभागाचे आवाहन

जाहिरात

 

शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावोगावी मोफत आरोग्य शिबिरे

schedule30 Sep 26 person by visibility 174 categoryआरोग्य

◼️कवठेसार येथे ४३८ जणांची तपासणी 

कवठेसार : सहकारमहर्षी स्वर्गीय शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीने शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात मंगळवारी (ता. २९) कवठेसार येथे करण्यात आली. या शिबिरात ४३८ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची देखील मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ झाला.

 ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच विविध आजारांचे वेळीच निदान होऊन त्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या शिबिरांत नयनतारा ऑप्टिकल्सच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी, दृष्टीविकाराचे निदान, आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले, तसेच चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शरद आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या माध्यमातून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जात आहे.
शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात टप्प्याटप्प्याने हे शिबिर आयोजित करण्यात येणार असून, १९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. प्रत्येक गावातील सार्वजनिक ठिकाणी एक दिवस हे शिबिर घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या गावातच विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ मिळणार आहे.

सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर यांच्या सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्याच्या स्मरणार्थ राबविण्यात येत असलेला हा आरोग्य उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे.


कवठेसार येथे झालेल्या आरोग्य शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी सरपंच पोपट भोकरे, उपसरपंच स्वाती भोकरे, माजी सरपंच जरीना फकीर, वैशाली माने, बशीर फकीर, बाळासो कुरणे, देवाप्पा मगदूम, रमेश मगदूम, विजय नांद्रेकर, के.जी. कांबळे, मौलाना लतीफ, संदीप गाडगे, भीमराव पाटील, बाबासो गाडवे, पवन सुतार यांच्यासह गावातील पदाधिकारी तसेच भोकरे हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes