SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. जयसिंगराव पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीनरुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा! मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राधानगरीत रुग्णांना फळवाटप'अपूर्वा' नगरात घुमला भक्तीचा गजर; चिमुकल्यांच्या स्वरांनी श्रोते मंत्रमुग्ध!मराठा साम्राज्याच्या इतिहासाची मोठी हानी; संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधनश्रीराम नवमी: भक्तीचा उत्सवशनिवारी कोल्हापूर शहरातील सर्व स्ट्रीट लाईट बंद ठेवुन 'अर्थ अवर'कोल्हापूर : घरफाळा दंडामध्ये व पाणी बिलातील विलंब आकारामध्ये 26 ते 31 मार्च अखेर 80 टक्के सवलतकोल्हापूर जिल्ह्यात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासनाकडून आवश्यक निर्बंधनिरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी : पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गती

जाहिरात

 

रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा! मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राधानगरीत रुग्णांना फळवाटप

schedule26 Mar 26 person by visibility 190 categoryसामाजिक

राधानगरी : महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मुश्रीफ साहेबांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने आणि समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

​साधेपणाने वाढदिवस साजरा
​वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता, रुग्णालयात केक कापून रुग्णांची विचारपूस करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना  फळांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाबद्दल बोलताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणपती गवळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.

​यावेळी बिद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र भाटळे म्हणाले की, "मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी असे सामाजिक उपक्रम राबवतो. यंदाही त्यांच्या सूचनेनुसार रुग्णांच्या सेवेला प्राधान्य दिले आहे. आणि भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम सुरू राहतील."

​या कार्यक्रमाला धैर्यशील पाटील कौलवकर, प्रा. किसन चौगले, संग्राम कलकुटे, संजयसिंह कलकुटे, राजेंद्र पाटील, भिकाजी एकल, विश्वास पाटील, आनंदा पोवार, संजय गोंझारे, बाळासाहेब कळमकर, विकास पाटील, तुषार पाटील, सचिन भाटळे, सुजित साळोखे, मंगेश राऊत, शिवाजी मोहिते यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes