SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहातघुणकीत गौतम बुद्धांची २५८८ वी जयंती साजरीजागतिक चित्रपटसृष्टीचा भारतीय मानदंड: सत्यजित रायअसाही एक . . . आगळा वेगळा शाही विवाह सोहळा'आरोग्याच्या सवयी बालपणातच दृढ होतात' : स्वच्छता निरीक्षक स्वप्निल उलपे यांचे प्रतिपादनकामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव : मंत्री मंगलप्रभात लोढास्वगणना मोहिमेस 1 मे पासून प्रारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांनी नोंदविला आपला सहभागराज्याच्या विकासात कोल्हापूरला प्रगतीपथावर नेऊया : पालकमंत्री प्रकाश आबिटकरबारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार गुणस्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

जाहिरात

 

घुणकीत गौतम बुद्धांची २५८८ वी जयंती साजरी

schedule02 May 26 person by visibility 167 categoryसामाजिक

घुणकी : येथील सिद्धार्थ नगर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्यावतीने जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची २५८८ वी जयंती साजरी करण्यात आली.


यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे यांच्या हस्ते गौतम बुद्धांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच  सुजाता जाधव यांच्या हस्ते प्रतिमेच्या समोरचे दीपप्रज्वलन करण्यात आले.

 यावेळी वारणा कारखान्याचे संचालक सुभाष जाधव यांच्या हस्ते जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे स्वागत करण्यात आले.

देशभरात १ मे कामगार दिन, महाराष्ट्र दिन तसेच गौतम बुद्ध यांच्या २५८८ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. या तिन्ही महत्त्वपूर्ण दिवसांच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, समता आणि प्रगतीचा संदेश देण्यात आला. यावेळी १४ एप्डॉरिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती निमित 'भारतीय संविधान' या विषयावर घेण्यात आलेल्या बहुपर्पयायी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या सर्व गुणवत्ता प्राप्त  विद्यार्थ्यांना जनसुराज्य पक्षाचे जिल्हाअध्यक्ष यांच्याकडून गिफ्ट देण्यात आले. निकाल पुढील प्रमाणे. खुला गटात संयुक्तरीत्या प्रथम क्रमांक कु दीक्षा बाळासो कांबळे, कु अद्वयी सचिन कांबळे, कु देविका देवानंद कांबळे यांना देण्यात आला. उर्वरित सर्वांनी ही चांगले गुण प्राप्त केलेबाद्द्ल गिफ्ट देण्यात आले. 

यावेळी शंकरराव कांबळे पुढे म्हणाले की, आज देशात युद्ध होत आहेत तर सर्वच देशाला आता युद्धाची गरज नसून बुद्धांची विचाराची गरज आहे. यावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुजाता जाधव यांनी दीपप्रज्वलन केले व वारणा कारखान्याचे संचालक  सुभाष जाधव, महात्मा फुले सूतगिरणीचे जनसंपर्क अधिकारी व ग्राम सदस्य रमेश पाटोळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष  सचिन कांबळे, उपअध्यक्ष महेंद्र कांबळे, सचिव गौतम कांबळे, सुभाष कांबळे, विकास कांबळे, अजित पाटोळे, बबन पाटोळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes