SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा उद्यापासून ४ दिवस दर्शनासाठी बंद!कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे 17 मार्च रोजी उद्घाटन!डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या क्रीडापटूंचा भव्य सन्मान सोहळा संपन्नचिकोत्रा नदी पात्रात 'उपसाबंदी' जाहीर! जाणून घ्या तुमच्या भागातील तारीख आणि नियम...राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिया"राज्यात पावसाची एन्ट्री! १७ मार्चपासून मेघगर्जनेसह बरसणार; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली."क्रांतिकारी सरदार उधम सिंह: जालियनवाला बागेचा सूड घेणारा महानायकगॅस टंचाईला चाप! पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर 'कंट्रोल रूम' सज्जसीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतर

जाहिरात

 

कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे 17 मार्च रोजी उद्घाटन!

schedule13 Mar 26 person by visibility 205 categoryसामाजिक

कोल्हापूर : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदनिमित्त कोल्हापूरच्या सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे आयोजन ईद फेस्टिव्हल कमिटीतर्फे करण्यात आले आहे. बिंदू चौक येथील पार्किंगच्या जागेत मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता या महोत्सवाचे भव्य उद्घाटन कोल्हापूरच्या महापौर  रूपाराणी  निकम यांच्या हस्ते पार पडणार आहे.
संस्थापक गणी आजरेकर यांनी २८ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयेशभाई कदम असून, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय राजकीय नेते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवात सुकामेवा, मसाले, शेवया, साखर, कांदे-लसूण, क्रॉकरी आणि इतर जीवनावश्यक वस्तू 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषतः बिर्याणी तांदळाचे ५ व १० किलोचे पॅक अत्यंत सवलतीच्या दरात मिळतील.
सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थापक गणी आजरेकर व संयोजन समितीने केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes