SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहनगडहिंग्लज तालुक्यातील मौजे नांगनूर इथे अंगणवाडीच्या नव्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटनभारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना मोठ्या संधी; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायुदल अधिकाऱ्यांकडून 'करिअर मार्गदर्शन'; हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवले वायुदलाचे अंतरंगशक्तिपीठ महामार्ग अलाइनमेंट बदल नको संपूर्ण महामार्ग रद्द करा; आजरा येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या मेळाव्यात निर्धारअण्णासाहेब पाटील महामंडळाची वैयक्तिक व गट कर्ज सुलभ परतावा योजनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास विभागाकडून निबंध स्पर्धेचे आयोजनकोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर बसस्थानकासह ४ बसस्थानकांचे होणार उद्घाटन; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कोल्हापूर दौराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट देवून खासदार महाडिक यांनी साधला संवादटायटॅनिक: एका भव्य स्वप्नाचा महासागरातील अंत

जाहिरात

 

अंबाबाई मंदिरमध्ये वस्त्र संहिता लागू केल्याबद्दल सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी संघटनांकडून आनंदोत्सव

schedule15 May 25 person by visibility 662 categoryसामाजिक

कोल्हापूर  :  काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमार्फत अंबाबाई मंदिरासह जोतिबा मंदिर येथे वस्त्र संहिता लागू करण्यात आली होती. त्या निर्णयाचे स्वागत करत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव माननीय  शिवराज नायकवडे यांचा सकल हिंदू समाज व हिंदुत्ववादी संघटनांकडून फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पूर्ण पारंपारिक वेशामध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

आई अंबाबाईचे शक्तीपीठ हा कोल्हापूरचा आत्मा आहे. गेल्या चार वर्षांपासून "सकल हिंदू समाज" या हिंदुत्ववादी संघटनेकडून आणि समस्त कोल्हापूरकरांकडून मागणी होत होती, की मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी एक ठराविक ड्रेस कोड असावा. मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी अंगप्रदर्शन करणारे तोकडे कपडे न घालता भारतीय पारंपारिक वेशभूषेत मंदिरात दर्शनासाठी यावे. वस्त्र संहितेच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल भाविकांकडून ड्रेस कोडसाठी चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 

 यावेळी बंडा साळुंखे, उदय भोसले, किशोर घाटगे, सुनील पाटील, अनिल चोरगे,निरंजन शिंदे, सिद्धार्थ कटकधोंड, मनोहर सौरप, योगेश केळकर, पांडुरंग पाटील, रश्मी साळुंखे, सविता खोराटे, रूपाली साळोखे, सुजाता पाटील, प्रशांत पाटील, अभिजीत पाटील, तन्मय गुरव, रोहिणी केसरकर यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes