SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम: वेदगंगा आणि हिरण्यकेशी नद्या इशारा पातळीच्या वर

schedule07 Jul 26 person by visibility 260 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, कोल्हापूर पाटबंधारे विभागाने (उत्तर) दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ०७/०७/२०२६ रोजी वेदगंगा आणि हिरण्यकेशी या दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
पाटबंधारे विभागाच्या सकाळी ७:०० वाजताच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी सध्या इशारा पातळीच्या खाली असली तरी, नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ५७ कोल्हापूर पद्धतीचे (को. प.) बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

 ◼️नद्यांची स्थिती: वेदगंगा नदी (बाणगे पूल) आणि हिरण्यकेशी नदी (भडगाव पूल) या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. इतर प्रमुख नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

◼️ पावसाचा जोर: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, सर्वाधिक पाऊस राधानगरी (१७६ मि.मी.) आणि दुधगंगा (१७७ मि.मी.) धरण क्षेत्रात नोंदवला गेला आहे.

 ◼️बंधारे: पंचगंगा, भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी, धामणी, वारणा, कडवी, दुधगंगा, शाळी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी आणि चित्री अशा विविध नद्यांवरील एकूण ५७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पूर नियंत्रण कक्षाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes