SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सहकाररत्न शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांना मान्यवरांकडून अभिवादनकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज मुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा : मंत्री हसन मुश्रीफआयटीआयमधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात उद्यमनगरीचा पाया रचणार्‍या म्हादबा मिस्त्री यांचा आदर्श ठेवावा, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहनडी.वाय.पाटील मेडीकल कॉलेजला विजेतेपदकामे न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा : आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांचे निर्देशप्राथमिक शिक्षण समितीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्राधान्य द्या, शाळांच्या भौतिक सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील : आमदार राजेश क्षीरसागरडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला कला, छायाचित्रणातून पन्हाळगडाचा इतिहासगांधीनगरच्या विषयावर सभा तहकूब? 'त्या' चर्चांना महापौरांचा पूर्णविराम; १ तारखेला पुन्हा महासभा

जाहिरात

 

सहकाररत्न शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांना मान्यवरांकडून अभिवादन

schedule23 Nov 26 person by visibility 116 categoryसामाजिक

जयसिंगपूर : सहकाररत्न शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांना त्यांच्या जयंतीदिनी पार्वती को-ऑपरेटिव इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड, यड्राव येथे असलेल्या त्यांच्या समाधीस्थळी अनेक मान्यवरांनी भेट देऊन अभिवादन केले.
सहकाररत्न स्वर्गीय शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

सोमवारी सकाळी सर्वप्रथम यड्रावकर परिवाराच्यावतीने माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शरद साखर कारखान्याचे संचालक आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह यड्रावकर परिवारातील सदस्यांनी शामरावअण्णा यांच्या समाधीस्थळी येऊन पुष्पगुच्छ वाहून आदरांजली वाहिली. 

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम.पाटील, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सर्व सदस्य, जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, कारखान्याचे संचालक जयपाल कुंभोजे, थबा कांबळे, संचालक सुभाषसिंग रजपूत, संजय बोरगावे, संजय नांदणे, अजित उपाध्ये, सुहास मुरगुंडे, प्रकाश पाटील टाकवडेकर, पार्वती को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटचे व्हाईस चेअरमन महावीर खवाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत पाटील, संचालक ताजोद्दीन तहसीलदार गुरुजी, यड्रावचे सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर, प्रकाश अकीवाटे, सुनील मजलेकर, राजेंद्र नांद्रेकर, मिलिंद शिंदे, शरद आलासे, बाळासाहेब दिवटे यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच  मान्यवरांनी समाधीस्थळी भेट देऊन शामरावअण्णांच्या स्मृतीस अभिवादन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes