उचगाव, यादववाडी येथे मॉडेल स्कूलचे उद्घाटन
schedule11 Oct 24 person by visibility 332 categoryसामाजिक
कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आज शुक्रवारी पार पडला. उचगावातील मणेर मळायेथे 23 फूट रुंदीच्या काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन आमदार आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते मान्यवरच्या उपस्थित करण्यात आला. या रस्त्यासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपये निधी खर्च झाला आहे. तसेच विद्यामंदिर यादववाडी, उचगाव येथे मॉडेल स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. या स्कूलमध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्डयुक्त डिजिटल क्लासरूम, टर्फ ग्राउंड, शाहू बाल कला मंच व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे.
यावेळी सतेज पाटील म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून एक सुसज्य शाळा बनली आहे. उद्याच्या भविष्य काळातील पिढी घडवणारी सुसज्ज शाळा बनली आहे. या शाळेतून उद्याच्या भविष्यामध्ये शासकीय पदाधिकारी घडावेत अशा शुभेच्छा दिल्या.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, मणेर परिसराचा मुख्य रस्ता व्हावा ही भावना होती. गावातील ग्रामपंचायत सदस्य याविषयी आग्रही होते. गावातील नेते मंडळींच्या सततच्या पाठ पुरावामुळे या रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे झाले. याचे मला समाधान वाटते. तसेच गावातील मुलांना बाहेर शिक्षण घेण्यासाठी न जाता गावामध्ये सुविधा दिली पाहिजे या भावनेतून काम झाले. जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे ही भूमिका गावातील सर्वांचीच होती. यासाठी आमदार फंडातून 75 लाखांचा निधी तसेच ग्रामपंचायतचा 25 लाख निधी असा एक कोटीचा निधी खर्च करून गावांमध्ये मॉडर्न स्कूल साकारले आहे. यातून येणारी भावी पिढी घडेल यातून देश पुढे जाणार आहे ही भूमिका घेऊनच आपण काम करत आहोत.
प्रास्ताविक मुख्याद्यापक ए. के. पाटील यानी केले. मनोगत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संजना बनसोडे यांनी मानले. ग्रा पं सदस्य श्रीधर कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
शाळेच्या विविध विकास कामांचे उदघाटन आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते फलकाची फीत कापून, डिजिटल वर्गाच उदघाटन आणि औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून करण्यात आली.यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, यांचा सत्कार करण्यात आला.
सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच तुषार पाटील
सदस्य ग्रामपंचायत उंचगाव, सर्व सदस्य शा.व्य.स.वि.मं. यादववाडी, शिक्षकवृंद वि.मं. यादवबाडी व ग्रामस्थ उपस्थित होते.