केंद्रीय सहकार मंत्रालयांतर्गत संयुक्त समितीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश
schedule22 Dec 22 person by visibility 2203 categoryदेश
नवी दिल्ली : संपूर्ण देशातील सहकार क्षेत्रासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नामदार अमित शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्रालयाचा कार्यभार आहे. बहुराज्य सहकारी संस्थांसाठी लागू असलेल्या कायद्यात काही सुधारणा करणे कालपरत्वे आवश्यक आहे. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील निवडक खासदारांची एक संयुक्त समिती तयार करण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजेच बहुराज्य सहकारी कायद्यांमध्ये कोणत्या सुधारणा करायच्या, कोणते बदल करायचे, याबाबत ही संयुक्त समिती एक अहवाल तयार करेल आणि तो आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करेल. संपूर्ण देशभरातील सहकार चळवळीसाठी हे विधेयक अत्यंत महत्वाचे आहे.
विधेयकात बदल आणि दुरूस्ती सुचवण्याच्या समितीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचा सहभाग झाल्याने, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.