कोल्हापूर : खरेदीचा बहाणा करुन बेकरी, किराणा मालाचे दुकानातून महिलांचे गळ्यातील जबरदस्तीने सोन्याचे दागीने चोरणाऱ्या दोघा आरोपींना अटक
schedule20 Oct 25 person by visibility 109 categoryगुन्हे

कोल्हापूर : खरेदीचा बहाणा करुन बेकरी, किराणा मालाचे दुकानातून महिलांचे गळ्यातील जबरदस्तीने सोन्याचे दागीने चोरणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 22 ग्रॅम सोन्याचे दागीने व चोरीची एक मोटर सायकलसह गुन्हा करण्याकरीता वापरलेले एक चारचाकी व एक दुचाकी वाहन असा एकूण 9,16,050/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.
गेले काही दिवसापासून बेकरी अगर किराणा दुकानात असणारे महिलांना टार्गेट करून दोन अनोळखी तरुण चारचाकी व दुचाकी वाहनावर वेगवेगळे नंबर तसेच स्टीकर लावून दुकानातून महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागीने जबरदस्तीने चोरण्याचे लागोपाठ पंधरा दिवसात दोन ठिकाणी गुन्हे घडले. सदरबाबत गोकुळ शिरगांव व शिरोळ पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले होते..
तपास पथकाने आज दि. 20 ऑक्टोबर रोजी पीर बालेसाहेब दग्र्याजवळ जावून आरोपी इम्रान समसुद्दीन मोमीन, वय 38, रा. बेघर वसाहत हेर्ले, ता. हातकणंगले, व सुदाम हणमंत कुंभार, वय 40, रा. आंदळी, ता. पलूस, जि. सांगली यांना पकडले. त्यांचे कब्जात सोन्याची दोन लहान मंगळसूत्र, लाल रंगाची तवेरा गाडी व इतर साहित्य मिळुन आले. त्यांचेकडे तपास केला असता त्या दोघानी मिळुन गोकुळ शिरगांव पोलीस स्टेशन, व पंधरा दिवसापूर्वी सी.बी.एस.एस टी. स्टॅन्ड कोल्हापूर येथून एक स्लेंडर मोटर सायकल चोरलेची तसेच गुन्हा करणेकरीता आणखीन एक स्लेंडर मोटर वापरलेची कबुली दिली. आरोपीकडून 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, चोरीची एक स्प्लेंडर मोटर सायकल तसेच गुन्हा करणेकरीता वापरलेली तवेरा गाडी एक व स्प्लेंडर मोटर सायकल एक व इतर साहित्य असा एकूण 9,16,050/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींना पुढील कारवाई करीता गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे हजर केले आहेत. नमुद आरोपीकडून जबरी चोरीचे दोन व मोटर सायकल चोरीचा एक गुन्हा असे एकूण 03 गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी धीरजकुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार प्रविण पाटील, सुरेश पाटील, हिंदुराव केसरे, रुपेश माने, दिपक घोरपडे, संजय पडवळ, अमित सर्जे, संतोष बरगे, रामचंद्र कोळी व सुशिल पाटील यांनी केली आहे.