कुर्ला येथे बेस्ट बसच्या भीषण अपघात ६ जणांचा मृत्यू, ३५ जण जखमी, अनेक वाहने चक्काचूर
schedule10 Dec 24 person by visibility 254 categoryगुन्हे
मुंबई : मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवल्याने सहाजणांनाचा मृत्यू झाल्याची माहिती असून, ३५ गंभीर जखमी झाले आहेत. या बसने १० वाहनांना धडक दिली यामध्ये अनेक वाहने चक्काचूर झाली . हा अपघात सोमवारी रात्री घडला. अपघातामध्ये काही जण गांभीर जखमी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
अपघाताच्या वेळी बसने बाजारपेठेत असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत काही रिक्षांचा चक्काचूर झाला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना आणि मृतांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.