येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार शिवाभाऊंना ठाण्यामध्ये शोधावे लागेल
schedule22 Nov 26 person by visibility 79 categoryराजकीय
◼️गडहिंग्लजच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा घनाघात
गडहिंग्लज : येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर चंदगडचे आमदार शिवाभाऊंना ठाण्यामध्ये शोधावे लागेल. त्यांना ठाण्यामध्ये कोणत्या ठिकाणी शोधावे लागेल हे मात्र आता आम्ही सांगणार नाही, असा घनाघात गडहिंग्लजच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या पत्रकावर प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे बांधकाम सभापती गुंडू पाटील, माझी उपनगराध्यक्ष किरण कदम,नगरसेवक राजू अण्णा खानगावे, अमर मांगले, उदय परीट,सौ.शबनम सय्यद, दीपक कुराडे, राहुल शिरकोळे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित होते
पत्रकात पुढे म्हटले आहे, आज चंदगड-गडहिंग्लजचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आमचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेबांवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करण्याचे श्रेय आपल्याला मिळत नाही, या द्वेषापोटी आणि अस्वस्थतेपोटीच त्यांनी विनाकारण आमच्या नेत्यांवर टीका केलेली आहे.
वास्तविक गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करावा ही सर्वपक्षीय शेतकऱ्यांची मागणी होती. यामध्ये फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेतकरी नव्हते. दिवाळीच्या काळात आमचे नेते श्री. मुश्रीफ साहेब या आंदोलनकर्त्यांच्या समोर आले. त्यांची भेट घेऊन त्यांनी दिवाळीनंतर होणाऱ्या दुष्काळी समितीच्या बैठकीमध्ये गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर करणार असे वचन दिले होते. त्याप्रमाणे दिवाळी झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये श्री. मुश्रीफ साहेबांनी सर्व शक्ती पणाला लावून गडहिंग्लज तालुका दुष्काळी जाहीर केला व त्याचा शासन निर्णयही पाठवला. सर्व आंदोलनकर्त्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
हे श्रेय आपल्याला मिळत नाही, तीन चतुर्थांश तालुका आपला आणि एक चतुर्थांश तालुका मुश्रीफ साहेबांचा, ही अस्वस्थता शिवाजी पाटलांना सहन झाली नाही. त्या अस्वस्थता आणि नैराश्यातूनच त्यांनी ही बेछूट विधाने केलेली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून येणाऱ्या गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता काही तो निकाल घेईलच. परंतु; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 17 एवढे नगरसेवक आता आहेत. त्यामुळे, जनता काय ठरवेल तो कौल आम्हाला मान्य आहे. परंतु; येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवाभाऊ दिसणार नाहीत. त्यांना ठाण्यामध्ये शोधावे लागेल. ठाण्यामध्ये कुठे शोधावे लागेल ते आता आम्ही सांगू शकत नाही.
□ आमदार शिवा भाऊंच्या अंतकरणाला ठेच.....!
गोकुळच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी मुश्रीफ साहेबांच्यावरच नेतृत्व देऊन जबाबदारी सोपवली. आम्हाला वाटतंय यामुळेही शिवाभाऊंना अंतःकरणाला ठेच लागली असेल. तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी पत्रक काढून या गोष्टीबाबत वाच्यता केली होती ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेलेली आहे.