अल्पसंख्यांकांनी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात पुढे येणे गरजेचे : बाप्तिस्त मोराईस
schedule18 Dec 24 person by visibility 191 categoryसामाजिक
कोल्हापूर : सध्याच्या देशातील एकंदरीत परिस्थिती पाहता अल्पसंख्याकानी शैक्षणिक सामाजिक, आर्थिक, क्षेत्रात पुढे येण्याची गरज आहे म्हणूनच नवीन पिढीने शिक्षणावर भर देऊन स्वावलंबी बनणे गरजेचे आहे असे प्रतिपादन बाप्तिस्त मोराईस यांनी केले. येथील नेहरू स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बाप्तिस्त मोराईस म्हणाले, अल्पसंख्याक दिन हा देशातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक यांच्या संरक्षण व संवर्धन करण्याची वचनबद्धता दर्शवणारा एक महत्त्वाचा प्रसंग आहे या दिवसाचे पालन विविधतेने सर्व समावेशकाचे आणि नागरिकांसाठी समान संधीचे महत्व अधोरेखित करत आणि त्याचे धार्मिक किंवा भाषिक संबंध कांहीही असो भारतासारख्या देशांमध्ये विविधतेतून एकात्मता ही परंपरा जोपासली पाहिजे परंतु आज 18 डिसेंबर अल्पसंख्यांक दिवस फक्त औपचारिकता म्हणून साजरा होतो अल्पसंख्यांकाच्या साठी असणाऱ्या विविध योजना सवलती या फक्त कागदावरच असतात संबंधित कार्यालय किंवा अधिकारी यांना याबद्दल विचारले असता उड़वा उड्ड़वी ची उत्तरे मिळतात.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, आणि प्रशासक कादरभाई मलबारी संस्थेचे उपाध्यक्ष आदिल फरास यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत मुख्याध्यापक ताशिलदार एम. एम. यांनी तर सूत्रसंचालन आर.डी मुल्ला यांनी केले. स्कूल कमिटी चेअरमन रफिक शेख यांनी आभार मानले याप्रसंगी लियाकत मुजावर जहांगीर अत्तार रफिक मुल्ला, मलिक बागवान, फारूक पटवेगार मा. पापाभाई बागवान, अल्ताफ झांजी, सर्व संचालक उपस्थित होते.