SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : लीशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावरील अनधिकृत पत्रा शेडवर महापालिकेची कारवाईआमदार यड्रावकर यांच्या हस्ते कवठेसार व कोथळीत ८८.२८ लाख रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात मंगळवारी 'कै. रामचंद्र कबनूरकर स्मृती' भव्य खुली एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धासंजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. रविंद्र धोंगडी यांना ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड’ने सन्मानितज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर आणि युवा पखवाजवादक कृष्णा साळुंखे यांना यंदाचा पहिलाच 'गुणीदास पुरस्कार २०२६ ' जाहीर, ६ डिसेंबर रोजी होणार पुरस्काराचे वितरणआंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन: ज्ञान, संघर्ष आणि परिवर्तनाचा संदेशकोल्हापुरात 'महा-पल्स एआय' प्रकल्पाचा शुभारंभशिरोली-किणी या मार्गावरील अपघातांचे ऑडिट करण्यात यावे : अपर जिल्हाधिकारी अजय पवारप्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूसाके येथे शोकाकुल पाटील कुटुंबीयांची पूनम तोडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

जाहिरात

 

कोल्हापूर : लीशा हॉटेल ते कदमवाडी रस्त्यावरील अनधिकृत पत्रा शेडवर महापालिकेची कारवाई

schedule17 Nov 26 person by visibility 154 categoryमहानगरपालिका

◼️फ्रंट सेडबॅकमधील अतिक्रमण निष्कासित; नोटीस देऊनही बांधकाम न हटविल्याने कारवाई

 

कोल्हापूर : शहरातील लीशा हॉटेल रोड ते कदमवाडी रस्त्यावरील व्यापारी व हॉटेल आस्थापनांनी रस्त्यालगतच्या फ्रंट सेडबॅक जागेत विनापरवाना पत्रा शेड उभारून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला होता. याबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित मिळकतधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५३ अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

नगररचना विभागाचे सहायक संचालक यांच्या उपस्थितीत संबंधित मिळकतधारकांची सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर दिलेल्या आदेशात सदर अनधिकृत बांधकामे अनुज्ञेय नसल्याचे स्पष्ट करून ती स्वतःहून काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, नोटीस व आदेश देऊनही संबंधितांनी अतिक्रमणे हटविली नाहीत.

त्यामुळे आज महापालिकेच्या उपद्रव शोध पथक, नगररचना विभाग आणि विभागीय कार्यालय क्रमांक ४ (छत्रपती ताराराणी मार्केट) यांच्या संयुक्त पथकाने लीशा हॉटेल रोड ते कदमवाडी रस्त्यावरील फ्रंट सेडबॅकमधील अनधिकृत पत्रा शेड निष्कासित करण्याची कारवाई केली.

ही कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी उपशहर रचनाकार महादेव फुलारी, पद्मल पाटील, कनिष्ठ अभियंते उमेश बागुल, प्रमोद बराले, चेतन आरमार, अवधूत नेर्लेकर, अतिक्रमण अधीक्षक प्रफुल कांबळे, उपद्रव शोध पथकाचे जवान तसेच अतिक्रमण, पवडी व नगररचना विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes