कोल्हापूर : के.एम.टी. उपक्रमाचा सन 2026-2027 चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर
schedule23 Mar 26 person by visibility 174 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : के.एम.टी. उपक्रमाचा सन 2025-2026 चा सुधारीत व सन 2026-2027 चा जमा खर्चाचा महसूली रु.11,45,000/- शिल्लकीचा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा आयुक्त आणि परिवहन व्यवस्थापक के.मंजूलक्ष्मी यांचे वतीने उप आयुक्त परितोष कंकाळ यांनी परिवहन समितीचे मान्यतेसाठी सभापती सत्यजीत जाधव यांचेकडे सादर केला.
नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यामध्ये अव्वल शिल्लकेसह महसूली जमा रु.74,12,05,000/- आणि महसूली खर्च रु.74,00,60,000/- असा रु.11,45,000/- चा शिल्लकी अंदाज, तर अव्वल शिल्लकेसह भांडवली जमा रु.30,81,01,000/- व भांडवली खर्च रु.29,64,15,000/- असा आहे. नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यामध्ये महापालिकेकडून महसुली खर्चासाठी अर्थसहाय्य रु.23.25 कोटी व PM e-Bus Sewa योजनेंतर्गत इलेक्ट्रिक बसेससाठी केंद्र शासनाकडून महसुली अनुदान म्हणून रु.333.00 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच, इलेक्ट्रिक बसेस सुरु करणेत येणार असलेने विजेवरील खर्चामध्ये बचत करणेच्या उद्देशाने DPDC अथवा मेडा अनुदानातून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी रु.500.00 लाख तरतूद भांडवली अंदाजपत्रकी करणेत आली आहे. तसेच, ITMS प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासन अनुदानातून रु.800.00 लाख तरतूद करण्यात आली आहे.
विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीमधून शहरामधील प्रमुख बस थांब्यांचे आधुनिकीकरण व सौंदर्यीकरण करणे, प्रमुख पार्किंगचे ठिकाणापासून श्री अंबाबाई मंदिरापर्यन्त शटल बस सेवा सुरु करणे, ऑपरेशनल सुधारणेसाठी डेटा आधारीत मार्गाचे नियोजन करणे, ताफा वापर 90 टक्के पर्यन्त वाढविणे, बसेस नादुरुस्तीचे प्रमाण किमान 20 टक्केपर्यन्त कमी करणे, चालकांना प्रशिक्षण देणे व इंधन खर्चामध्ये बचत करणे, इ. उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत.
सन 2026-2027 चे नवीन अंदाजपत्रकामध्ये के.एम.टी. बस ताफ्यातील 65 डिझेल इंधनाच्या व PM e-Bus Sewa प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 40 इलेक्ट्रिक बसेस पुढील आर्थिक वर्षामध्ये दाखल होऊन पुढील वर्षभरात दैनंदिन एकूण 88 बसेस मार्गस्थ राहतील, असे नियोजन करणेत आले आहे. सदर बसेस पासून प्रवासी तिकीट विक्रीतून मिळालेले उत्पन्न व पे ॲण्ड पार्किंग, बसवरील जाहिरात इत्यादी मार्गाने येणारे उत्पन्न महसूली जमेस धरणेत आले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून नवीन अत्याधुनिक डेपो विकसीत करणेत येत असून, यामध्ये चार्जिंग स्टेशन, प्रशासकीय इमारत, वर्कशॉप, कर्मचाऱ्यांसाठी रेस्ट रुम व कॅण्टीन सुविधा, पूर्ण डेपोचे काँक्रीटीकरण, ETP (Effluent Treatment Plant) व STP (Sewage Treatment Plant), संपूर्ण डेपोचे यार्ड लायटींग, वॉशिंग रॅम्प, स्टोअर रुम, उपलब्ध होणाऱ्या जागेमध्ये हिरवळ व वृक्षारोपण इ. सोई-सुविधा निर्माण करणेत येणार आहेत.
केंद्र शासनाच्या योजनेतून सार्वजनिक परिवहन उपक्रमांकडील ITS यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी निधी उपलब्धतेनुसार ITS यंत्रणा विकसीत करुन, त्यामधून ॲण्ड्रॉईड बेस्ड ई-तिकीटींग डिव्हाईस, संगणकीकृत पास वितरण यंत्रणा, मोबाईल ॲपद्वारे तिकीट विक्री, डिजीटल पेमेंट, PIS, MIS, जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, VTS, कमांड कंट्रोल सेंटर कार्यान्वित करणेत येणार आहे. त्यासाठी रु.800.00 लाख तरतूद करण्यात आली आहे.
वरीलप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन 2026-27 या आर्थिक वर्षाचे नवीन अंदाजपत्रकामध्ये प्रमुख बाबींचा समावेश करुन दैनंदिन वाहतूक संचलन सुरळीत ठेवणेसाठी नवीन अंदाजपत्रक “ब” आयुक्त आणि परिवहन व्यवस्थापक के.मंजूलक्ष्मी यांचे वतीने उप आयुक्त परितोष कंकाळ यांनी परिवहन समितीचे मान्यतेसाठी सभापती सत्यजीत जाधव यांचेकडे सादर केले आहे. परिवहन समितीचे मान्यतेनंतर सदरचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे शिफारसीसह महासभेच्या अंतिम मान्यतेसाठी सादर होईल. या अर्थसंकल्पीय बैठकीस परिवहन समिती सदस्य दुर्वास कदम, उमेश पोवार, मानसी लोळगे, श्रीधर गाडगीळ, प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये, महेंद्र कोरडे, अक्षय शेळके, उप आयुक्त परितोष कंकाळ, अति.परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक, प्रकल्प अधिकारी पी.एन. गुरव, लेखापाल राजेंद्र सुर्यवंशी, संतोष लोखंडे आदि उपस्थित होते.


