SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सुवर्णझेप! मीराबाई चानूचा इतिहास; ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक!घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनपैशांअभावी शस्त्रक्रिया थांबणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडीकेटीईच्या २९ विद्यार्थींनींची कॅपजेमिनी या नामांकीत कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवरती निवडजिल्हाधिकारी कार्यालय येथे 27 वा कारगिल विजय दिवस साजराडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवडजलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार : जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील​"मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही"महसूल सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरकारगिल विजय दिवस: भारतीय शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचा सुवर्णदिन

जाहिरात

 

उंचगावमध्ये स्मार्ट मीटर सक्तीला शिवसेनेचा विरोध; स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम नको: विक्रम चौगुले यांचा इशारा

schedule09 Jun 26 person by visibility 455 categoryराजकीय

कोल्हापूर  : उंचगाव (ता. करवीर) येथे महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या बसवण्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. स्थानिक जनतेला कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा विश्वासात न घेता सुरू असलेल्या या कारवायांविरुद्ध शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा समन्वयक विक्रम चौगुले यांनी शाखा अभियंता संदीप काकडे यांची भेट घेऊन तीव्र निषेध नोंदवला आहे. 

या परिसरातील ६० ते ७० हजार लोकवस्तीमध्ये कामगार आणि रोजंदारीवर काम करणारा मोठा वर्ग राहतो, ज्यांच्यावर आधीच महागाईचे संकट असताना स्मार्ट मीटरचा जादा बोजा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. वायरमनकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत, शिवसेनेने हा प्रकार थांबवण्याची मागणी केली आहे.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रम चौगुले यांनी महावितरणच्या शाखा अभियंत्यांकडे मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकांना विश्वासात घेतले आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे. अर्थिंगची सुविधा नसलेल्या घरांमध्ये स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचे नुकसान होणे आणि प्लगमध्ये मोबाईल चार्जर लावला तरी वीज वापर सुरूच दाखवणे, अशा तांत्रिक त्रुटींकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. यावर शाखा अभियंता संदीप काकडे यांनी हे मुद्दे वरिष्ठांपर्यंत पोहोचवून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, स्थानिकांना विश्वासात न घेता मीटर बसवल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. 

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रम चौगुले, विराट करी (माजी उपसरपंच), भाऊ चौगुले (माजी युवा सेना तालुकाप्रमुख), महेश खांडेकर (माजी ग्रामपंचायत सदस्य) यांच्यासह अमोल पोवार, राम पाटील, गणेश मस्कर, गणेश गावडे, सचिन माने, अजित रोटे, सचिन गुरव, प्रमोद शिंदे, मुमताज धारवाडकर, अनिल माने, जीतू सुतार, आंबा जाधव, धनंजय पाटील, हौसेराव राजमाने, जगन्नाथ माने, सुनिल पारपानी, दिपक फ्रेमवाला, विनोद रोहीडा, उत्तम आडसुळ, अनिल माळी, सुजल पवार, रंगराव पाटील, चेतन ननवरे, शिवम चौगुले, सुमित लांबोरे, अथर्व सूर्यवंशी, शिवाजी लोहार, बंडा यडुरकर, पाटील मामा यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes