ऊस गाळप हंगाम : कोल्हापूर शहरातील रहदारी नियमन अनुषंगाने सुचना दर्शक फलक; तसेच ऊस वाहतूक मार्ग
schedule25 Nov 25 person by visibility 93 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सन २०२५-२६ करीता सुरु झाला आहे. साखर कारखान्यांना जिल्ह्यातुन व इतर ठिकाणाहून ऊस वाहतुक व पुरवठा केला जाणार आहे. सदरची ऊस वाहतुक ही ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाड्या इत्यादी वाहनांच्या मदतीने होणार आहे. कोल्हापूर शहरातील वाहनांची रहदारी पाहता शहरातील वाहतुक सुरक्षित व नियंत्रित राहणे आवश्यक आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्या अनुशंगाने पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, यांचे आदेशान्वये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सन २०२५-२६ या कालावधीत ऊस वाहतुक करणारे वाहनांचे वाहतुकीचे नियमन करण्याच्या अनुशंगाने शहरातुन ऊस वाहतुक करणारे वाहनांना दि. ०३/११/२०२५ रोजी पासून गळीत हंगाम संपेपर्यंत कोल्हापूर शहरातुन रात्रौ १०.०० वा. ते सकाळी ०६.०० वा. या वेळेमध्ये करण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
काही ऊसवाहतूक करणारे वाहनांवरील चालक हे वरील प्रमाणे दिलेल्या निर्देशांचे पालन करीत नाहीत. प्रवेश बंद केलेल्या मार्गातून ऊसवाहतूक करतात ती होवू नये दिलेल्या निर्देशाप्रमाणेच ऊस वाहतूक होणे आवश्यक असलेने वाहतूक शाखेकडून शहरात ठिकठिकाणी सूचना दर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. तरी ऊस वाहतूक करणा-या सर्व वाहन चालकांनी सुचना फलकावरील निर्देशाप्रमाणे ऊस वाहतूक करावी अन्यथा कारवाई होण्याची शक्यता आहे.
